Tarun Bharat

शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य मिळणे हे, उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक : कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के

प्रतिनिधी / शिराळा

शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्याला मिळणे, हे आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे. असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी. टी. शिर्के यांनी केले. ते शिराळा येथील विवेकानंद व्याख्यानमालेत बोलत होते. व्याख्यानमालेचे हे चोविसावे वर्ष आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक वैजनाथ महाजन होते.

डॉ. शिर्के यांनी ‘उच्च शिक्षणातील नव्या दिशा ‘ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, समाजाशी नातं जोडणं त्यांच्या विषयावर चिंतन करणे, हे कुलगुरूंचे कर्तव्य आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार बहुशाखीय शैक्षणिक संस्थांचा आणि महाविद्यालयांची निर्मिती करावी लागणार आहे. हे धोरणात विद्यार्थी केंद्रबिंदू मानून तयार केले आहे. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञान कक्षा विस्तारण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. मुख्य विषयाबरोबरच इतर विषयांचे ज्ञानार्जन करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

Related Stories

शालेय विद्यार्थ्यांना दिवाळीची 5 दिवस ‘ऑनलाईन’ सुट्टी!

Tousif Mujawar

शिरोळ तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीसाठी मतदान यंत्रणा सज्ज

Archana Banage

कोल्हापूर : भरमसाठ वीजबिलाने हैराण धामोड ग्रामस्थांची बिले माफ करण्याची मागणी

Archana Banage

महापुराने करवीरमध्ये कोट्यावधी रुपयांची खते गेली पाण्यात

Archana Banage

…तर अलमट्टी वाढवण्याचा प्रयत्न हाणून पाडू: राजेंद्र पाटील-यड्रावकर

Archana Banage

कोल्हापूरात ३ कोटी किमतीची व्हेल माशाची उल्टी जप्त; तिघांना अटक

Abhijeet Khandekar