Tarun Bharat

शिक्षण विस्तार अधिकारी आर. व्ही. कांबळेंची होणार चौकशी

प्रतिनिधी / कोल्हापूर

माध्यमिक शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी आर. व्ही. कांबळे यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक शाळांतील मुख्याध्यापकांकडून माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. लोहार यांनी या सर्व तक्रारी एकत्रित करून सामान्य प्रशासन विभागाचे चौकशीसाठी सुपूर्द केल्या आहेत. त्यानुसार या चौकशीसाठी वर्ग 1 च्या अधिकार्‍यांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी दिली.

आर. व्ही. कांबळें यांच्याविरोधात माध्यमिक शिक्षणाधिकारी लोहार यांच्याकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये शाळा तपासणीच्या नावाखाली अर्थिक मागणी करणे, मागणीची पुर्तता न केल्यास शाळेची मान्यता रद्द करणार असल्याचे सांगणे, जिल्हा परिषदेमध्ये कामानिमित्त आलेले मुख्याध्यापक, लिपिक, व शाळा कर्मचार्‍यांशी उद्धटपणे वागणे, अधिकाराचा गैरवापर करून नाहक त्रास देणे आदी विविध तक्रारींचा समावेश आहे. हे सर्व तक्रारअर्ज एकत्रित करून शिक्षणाधिकार्‍यांनी पुढील चौकशीसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवले आहेत. त्यानुसार उपमुख्यकार्यकारी अधिकारी आडसूळ यांनी सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वर्ग 1 च्या अधिकाऱयांची समिती नियुक्त करून सखोल चौकशी करणार असल्याचे सांगितले. तसेच चौकशीमध्ये कांबळे यांचा कोणताही हस्तक्षेप होऊ नये यासाठी त्यांची चौकशीपूर्वीच त्यांची शाहूवाडी तालुक्यात अथवा इतरत्र बदली करणार असल्याचेही आडसूळ यांनी स्पष्ट केले.

Related Stories

शिवसेना शिंदे गट युवा सेनेच्या पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

Archana Banage

मलकापूर येथील युवकाची उजळाईवाडी येथे आत्महत्या

Archana Banage

ई-इन्व्हाईसमुळे बसणार जीएसटी करचुकवेगिरीला चाप- सहा.आयुक्त मोहन वाघ

Abhijeet Khandekar

दिलासादायक : महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.54 %

Tousif Mujawar

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु; शिवसेना कोणाची? ठाकरेंची की शिंदेंची ?

Abhijeet Khandekar

लॉकडाऊन रद्द करा, अँटिजेंन टेस्ट वाढवा : अॅड.अमित शिंदे

Archana Banage