Tarun Bharat

शिक्षण संचालनालयातील कर्मचाऱयांसाठी आयोजित कार्यशाळेला उत्स्फुर्त प्रतिसाद

प्रतिनिधी/ पणजी

नव्या काळातील बदलांना सामोरे जाण्यासाठी आणि कर्मचाऱयांची कार्यप्रणाली अधिक गतीशील करण्यासाठी ‘धी राईज- रि इंटीग्रल ऍण्ड स्टेप फोरर्वड टू एक्सेल’ ही प्रशिक्षण कार्यशाळा उच्च शिक्षण संचालनालयातील कर्मचाऱयांसाठी आयोजित करण्यात आलेली होती.

पणजी येथील संस्कृती भवनातील मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत 70 कर्मचाऱयांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेचे उद्घाटन उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य प्रशिक्षक म्हणून मास्टर टेनर किशोर शहा व कार्यशाळा समन्वयक साहाय्यक संचालक अशांक देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

 एक दिवसीय कार्यशाळेत कर्मचाऱयांचा व्यक्तिमत्त्व विकास, कार्यालयीन कामकाजात कर्मचाऱयांनी एकत्रित येऊन काम करण्याचे महत्त्व याशिवाय कार्यालयीन कामकाजातील ध्येयप्राप्ती, नव्या बदलाना सामोरे जाण्याचे कौशल्य अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

कर्मचाऱयांच्या समस्यांवर चर्चा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यशाळेत केवळ मार्गदर्शकाचे सत्र असे स्वरुप न ठेवता कर्मचाऱयांच्या कार्यालयीन कामकाजातील समस्या काय आहेत, त्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, आदी विषयांवर चर्चा करून कर्मचाऱयांना बोलते करण्यात आले. व त्या समस्यांवर मात कशी करावी, याचे प्रशिक्षण देण्यात आले.

या कार्यशाळेचा भाग म्हणून पुढील काळात कर्मचाऱयांकडून एक स्वतंत्र प्रकल्प ठरावीक वेळेत करून घेतला जाणार आहे. यावेळी कार्यशाळेतील सहभागींना मान्यवरांच्याहस्ते प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. उच्च शिक्षण संचालनालयाचे साहाय्यक संचालक अंशाक देसाई यांनी कार्यशाळेचे सूत्रसंचालन करून आभार मानले.

Related Stories

लोकोत्सव 2023 आजपासून

Amit Kulkarni

अंतिमसंस्कार साहित्याची विनामूल्य सेवा

Omkar B

मातेच्या अश्रूंची न्यायालयाकडून दखल पोटच्या गोळय़ाला वाचविण्यासाठी धडपड : मातेच्या जिद्दीचा महिला न्यायाधीशांकडून सन्मान

tarunbharat

प्रेक्षकांविना खेळतानाही जोश कमी होणार नाही

Patil_p

आमदार मायकल लोबोंचा वाढदिवस उत्साहात

Patil_p

केरी सत्तरीतील पाणीपुरवठय़ासाठी पर्यायी व्यवस्था

Omkar B