Tarun Bharat

शिखा पांडे, संजुला नाईकची सीनियर महिला चॅलेजर्स स्पर्धेसाठी निवड

Advertisements

क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव

गोव्याची कप्तान शिखा पांडे आणि संजुला नाईक यांची सीनियर महिला चॅलेंजर्स चषक एकदिवशीय लढतीसाठी निवड झाली आहे. अखिल भारतीय महिला निवड समितीने भारत अ, ब, क अणि ड असे चार संघ निवडले आहेत. या एकदिवशीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 4 ते 9 डिसेंबर या कालावधीत विजयवाडा येथील आंध्रप्रदेश क्रिकेट संघटनेच्या क्रिकेट कॉम्प्लेक्सवर होईल.

शिखा पांडे इंडिया क संघाचे कप्तानपद भुषवेल तर संजुला नाईक इंडिया ‘ड‘ संघात निवड झाली आहे. हल्लीच झालेल्या महिलांच्या एकदिवशीय स्पर्धेत शिखा पांडेने 6 सामन्यांतून 144 धावा केल्या होत्या व 7 विकेट्स घेतल्या होत्या. संजुला नाईकने 6 सामन्यांतून 58 धावा केल्या. मात्र तिने पंजाबविरूद्ध केलेली 40 धावांची खेळी तिच्या निवडीस कारणीभूत ठरली.

 शिखाने भारतासाठी खेळताना 55 एकदिवशीय लढतीतून 512 धावा आणि 75 गडी बाद केले असून टी-20 क्रिकेटमध्ये 56 सामन्यांतून तिच्या नावावर 207 धावा आणि 40 विकेट्सची नोंद आहे. संजुलाची 19 वर्षांखालील मुलींच्या चॅलेंजर स्पर्धेसाठी यापूर्वी निवड झाली होती. सीनियर महिला चॅलेंजर एकदिवशीय क्रिकेट स्पर्धेसाठी तिची पहिल्यांदाच निवड झाली आहे.

Related Stories

मडगाव स्कूल कॉम्प्लॅक्स पतसंस्थेला 50 लाखाहून अधिक नफा; सभासदांना 15 टक्के केला परतावा

Amit Kulkarni

कित्येक पक्षांकडून संपर्क पण आहे तेथेच राहणार

Amit Kulkarni

लोकसभेच्या दोन्ही जागाही जिंकणार

Omkar B

विजय पै यांचा तृणमूलला रामराम

Amit Kulkarni

सर्वांना सामावून घेणारा अर्थसंकल्प : तानावडे

Amit Kulkarni

किर्लोस्कर मोटरची टोयोटा अर्बन प्रुजर सादर

Patil_p
error: Content is protected !!