Tarun Bharat

शिपाई, स्वच्छता कर्मचाऱयांना मार्गदर्शन

प्रतिनिधी /बेळगाव

एसजीबीआयटी कॉलेजच्या एनएसएस विभागाच्यावतीने शिपाई व स्वच्छता कर्मचाऱयांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्मचाऱयांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. या कार्यक्रमाला प्रा. मंजुनाथ शरप्पण्णावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा. मंजुनाथ म्हणाले, प्रत्येकाला स्वच्छता ही महत्त्वाची आहे. घरी असो किंवा कार्यालयात स्वच्छता ही राखलीच पाहिजे. प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱयाने प्रामाणिकपणे व उत्साहाने आपले कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य डॉ. बी. आर. पतगुंडी यांनी अध्यक्षीय भाषण केले. एनएसएसचे प्रमुख प्रा. किरण नंदी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये 40 हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी प्रा. चैतन्य मलकाचे, प्रा. बाळू पाटील, प्रा. रेखा एस. एम., प्रा. शाहीन मुजावर, प्रा. विनायक एच., प्रा. शैलजा माळी यांच्यासह इतर उपस्थित होते.

Related Stories

कवितेतून मांडले वास्तवतेचे दर्शन

Amit Kulkarni

बेळगुंदी ग्राम पंचायतीमध्ये 91 टक्के मतदान

Patil_p

विविध मागण्यांसाठी अक्षरदासोहच्या कर्मचाऱयांचा मोर्चा

Patil_p

किरण जाधव यांच्यावतीने आनंदोत्सव

Patil_p

सापांचे संवर्धन काळाची गरज

Amit Kulkarni

उचगावमधील माध्यमिक शाळा पाच दिवस बंद

Amit Kulkarni