Tarun Bharat

शिमला : ज्यूरी कॉलनीतील आयटीबीपीतील 18 जवान कोरोना पॉझिटिव्ह

Advertisements

ऑनलाईन टीम / शिमला : 


हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील ज्यूरी कॉलनीच्या एसजेवीएनएलमध्ये संस्थात्मक क्वारंटाइन असलेल्या आयटीबीपीतील 43 व्या बटालियन मधील जवानांमध्ये कोरोनाची बाधा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. 
ज्यूरी कॉलनीत पुन्हा एकदा 18 जवानांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. याआधी 19 आणि आता 18 नवे कोरोना रुग्ण आढळल्याने प्रशासन आणि आयटीबीपीमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. 


एसडीएम रामपूर सुरेंद्र मोहन यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, काल 41 जवानांचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील 18 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 


रोहडू मधील मेहंदलीमध्ये उत्तर प्रदेशातील आजमगडमधून आलेले दोन मजूर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दोघेही होम क्वारंटाइन होते. त्यातील एकजण  24 तर दुसरा 55 वर्षांचा आहे. एसडीएम रोहडू बी आर शर्मा यांनी सांगितले की, संबधित क्षेत्र सील करण्यात आले आहे. 


बिलासपुर मधील मोरसिंघमधील एक गर्भवती महिला, तीचा पती आणि एका अन्य युवतीस कोरोनाची बाधा झाली आहे. चंबा जिल्ह्यामध्ये बिहार आणि आग्र्याहून आलेली एक महिला आणि एक पुरुष यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. दोघेही होम क्वारंटाइन होते. सीएममो डॉ. राजेश गुलेरी यांनी सांगितले की, दोघांनाही बालूमधील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. 

Related Stories

महिलेच्या नावाने घर विकत घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देणार : अजित पवार

Rohan_P

भारतात कोरोनाचे आणखी दोन नवे स्ट्रेन

datta jadhav

उत्तर प्रदेशच्या मजूरांना परत आणणार : योगी आदित्यनाथ

prashant_c

देशात लसीकरणाला वेग

datta jadhav

जम्मूतील इस्लामी विद्वानाचे कोरोनाने निधन

Amit Kulkarni

विश्वजीतचा भविष्यकाळ काँग्रेसमध्ये चांगला- बाळासाहेब थोरात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!