Tarun Bharat

शियेतील तरुण पॉझिटिव्ह : तीन दिवस लाॅकडाऊन

शिये/प्रतिनिधी

शिये ( ता.करवीर) येथील एक तरुण कोरना पॉझिटिव्ह आल्यामुळे शिये गाव भाग तीन दिवस लाॅकडाऊन करण्यात आला आहे.
दोन दिवसापूर्वीच क्रशर विभागातील एक मजूर कोरणा पॉझिटीव्ह आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीने क्रशर विभाग पाच दिवस पूर्णपणे बंद ठेवला होता. त्यातच गाव भागातील एक तरुण पॉझिटिव्ह आल्याने गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ग्रामपंचायतीने गावभाग लॉकडाऊन केला आहे. तर गावभाग निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकाऱ्यांनी त्या पॉझिटिव्ह तरुणाच्या संपर्कात आलेल्या सहा व्यक्तींना स्वॅब घेण्यासाठी सीपीआर हॉस्पिटल ला पाठवले आहे.

Related Stories

शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार

Abhijeet Khandekar

कचरागाडीची जीपीएस तपासणी होणार

Patil_p

घोरपड तस्करी करणाऱ्याला अटक, राधानगरी वनविभागाची कारवाई

Archana Banage

कोल्हापूर शहरातील 6 गुंड जिल्ह्यातून 2 वर्षासाठी हद्दपार

Archana Banage

कराडचा अमिर शेख एक वर्षासाठी स्थानबद्ध

Patil_p

जयंत पाटलांच्या प्रेमाचे रूपांतर विकासात करू : शेखर इनामदार

Archana Banage