Tarun Bharat

शियेत आणखी तीन पॉझिटिव्ह : एकूण संख्या आठवर

शिये /प्रतिनिधी

शिये ता. करवीर येथील गावभागातील आणखी एका तरुणाचा कोरोना अहवाल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शियेतील कोरोना रुग्णांची संख्या पाच झाली आहे. शिये फाटा येथील क्रशर विभाग, गावभाग, विठ्ठल नगर, श्रीरामनगर परिसरात आणि पुन्हा गावभागात कोरोना रुग्ण आढळून आल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिये येथे कोरोनाचा कहर सुरूच असून आज दुपारी आणखी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावातील बाधितांची संख्या आठ झाली आहे.

रविवारी रात्री रामनगर येथील युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या चौदा जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी तिघा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये रामनगर येथे राहणारे त्या युवकाचे वडिल व चुलत बहीण आणि गाव भागातील चुलत बहीण यांचा समावेश आहे. दरम्यान गावात समूह संसर्गाचा धोका निर्माण झाल्याने ग्रामपंचायतीने व कोरोना दक्षता समितीने ग्रामस्थांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. शिये येथे कोरोनाचा कहर सुरूच असून आज दुपारी आणखी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावातील बाधितांची संख्या आठ झाली आहे.

Related Stories

माजी मुख्यमंत्र्यांच्या गावातील कोविड सेंटरची मान्यता रद्द करण्याची नामुष्की

Archana Banage

प्राथमिक शिक्षक बँक निवडणूकीत ‘डाव-प्रतिडाव’

Kalyani Amanagi

पोवईनाक्यावर जुगार खेळणारे नऊजण ताब्यात

Patil_p

आरक्षणाच्या मोर्चासाठी राज्यातून मराठा समाज येणार

Archana Banage

शिवसेनेत नसताना संभाजीराजेंना तिकीट का द्यावे?

datta jadhav

मळणी यंत्रात हात अडकून शेतकरी गंभीर जखमी

Abhijeet Khandekar