Tarun Bharat

शिये क्रशरविभाग पाच दिवस लॉकडाउन : सरपंच

वार्ताहर / शिये

लाटवडे रोड येथील पॉझिटीव्ह रुग्ण शिये (ता. करवीर ) येथील क्रशर विभागातील बारा जणांच्या संपर्कात आल्याने क्रशर विभागातील सर्व व्यवहार सोमवार ते शुक्रवार पाच दिवस बंद ठेवणार असल्याची माहिती सरपंच रणजित कदम यांनी दिली.

लाटवडे रोड येथील पाॅझिटीव्ह रुग्ण शिये येथील क्रशरवर दिवाणजी होता. तो ३० जून पासून कामानिमित्त तीन वेळा शियेतील क्रशर विभागात (शिवाजीनगर) येथे आहे होता.या दरम्यान तो बारा जणांच्या संपर्कात आला आहे.या बारा जणांना प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सी.पी आर.हाॅस्पीटलला दाखल केले आहे.तसेच खबरदारी म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने क्रशर विभाग, शिंदे मळा निर्जंतुकीकरण करण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे.तसेच बुधवारी होणारा आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याचे सरपंच रणजित कदम यांनी सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, सतीश कुरणे, बाबासो बुवा, जयसिंग फडतारे, तानाजी चव्हाण आदी उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापूर महापालिका घरफाळा प्रकरणातील संशयितांचा अटकपूर्व जामीन नामंजूर

Archana Banage

2 कोटी 12 लाखांची अर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल

Abhijeet Khandekar

वाकळवाडीत कोरोनाबाधिताची संख्या पोहचली तीनवर

Patil_p

जागतिक बुद्धिबळदिनानिमित्त सांगलीमधून विविध ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन

Archana Banage

शाहूवाडी पोलिसांकडून नाकाबंदी करून कारवाई सुरू

Archana Banage

अनिल देशमुख यांच्याविरोधात 7000 पानांचे आरोपपत्र

datta jadhav