Tarun Bharat

शिये ग्रामपंचायत निवडणूक प्रभाग आरक्षण जाहीर

वार्ताहर / शिये

शिये ( ता.करवीर) येथील ग्रामपंचायतीच्या सन २०२० पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले. करवीरचे मंडल अधिकार अनिल काटकर, तलाठी जी.डी.पवार, निवास जाधव, हरीश शिंदे, ग्रामसेवक के. बी.पाटील यांनी आरक्षण जाहीर केले. यावेळी माजी जि.प. सदस्य बाजीराव पाटील, सरपंच रणजित कदम माजी पं.स. सदस्य जयसिंग काशीद ,पांडुरंग पाटील, सतीश कुरणे, सर्व ग्रा. प. सदस्य हे प्रमुख उपस्थित होते.

२०१५ च्या जनगणनेनुसार ९५०३ लोकसंख्या असलेल्या या गावात ६३५२ मतदार आहेत.याठिकाणी सहा प्रभागात १७ जागा विभागण्यात आल्या आहेत.यामध्ये सर्वसाधारण पाच, सर्वसाधारण महिला चार, नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला तीन, नागरीकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण दोन, अनुसूचित जाती महिला दोन, अनुसूचित जाती सर्वसाधारण एक अशी विभागणी केली आहे.

प्रभाग निहाय आरक्षण पुढील प्रमाणे : प्रभाग एक( जागा ३) सर्वसाधारण एक, सर्वसाधारण महिला एक, नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण एक, प्रभाग २( जागा ३ ): सर्वसाधारण एक, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला एक , अनुसूचित जाती महिला एक, प्रभाग ३( जागा २) :सर्वसाधारण एक, अनुसूचित जाती महिला एक ,प्रभाग चार (जागा ३): सर्वसाधारण एक,सर्वसाधारण महिला एक, नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण एक, प्रभाग ५ ( जागा ३): सर्वसाधारण महिला एक ,नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला एक, अनुसूचित जाती सर्वसाधारण एक , प्रभाग ६ ( जागा ३) सर्वसाधारण एक, सर्वसाधारण महिला १, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला एक असे आहे.

यावेळी विविध गटाचे, पक्ष, संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

शियेतील कोरोना बळीची संख्या दोन : बाधितांची संख्या अकरावर

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना मृत्यू, नव्या रूग्णांसह सक्रीय रूग्णांत वाढ

Archana Banage

कोल्हापूर : शिवपुतळा विटंबना करणाऱ्याला तत्काळ अटक करा; सर्वपक्षीय संघटनांची मागणी

Archana Banage

बहिरेश्वर येथील ‘त्या’ महिलेच्या संपर्कातील अठरा जण निगेटीव्ह

Archana Banage

छत्रपती शिवाजी आणि राजर्षी शाहू महाराजांना अमित शहांनी केले अभिवादन

Archana Banage

…तर गोकुळची निवडणूक कशाला ?

Archana Banage