Tarun Bharat

शिरगावात एकाच घरातील तब्बल 20 जण पॉझिटिव्ह

Advertisements

शिरगाव / वार्ताहर

शिरगाव ( ता राधानगरी ) येथे आज एकाच घरातील तब्बल 20 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गावातील एकूण रुग्णांची संख्या 21 वर पोहोचली असून संपूर्ण गावभर भीतीचे वातावरण पसरले आहे परिणामी खबरदारी व सुरक्षितता म्हणून ग्रामपंचायत पदाधिकारी व दक्षता कमिटीने संपूर्ण गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून नागरिकांनी होम क्वारंटाईन व्हावे असे आवाहन केले आहे .

पाच दिवसापूर्वी त्रेचाळीस वर्षाचे जाधववाडी गावाहून जावई व लेक शिरगाव येथे सासुरवाडीला आले होते .गुरुवारी सायंकाळी त्यांना सर्दी , ताप , खोकल्याचा त्रास होऊ लागला म्हणून त्यांचा स्वॅब तपासणीसाठी नेला होता. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सासुरवाडीतील तब्बल 27 जणांना क्वारंटाईन केले होते. त्यापैकी आज सायंकाळी चार वाजता वीस जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात एकच खळबळ माजली आहे.

अजूनही त्यांच्या संपर्कात कोण आहेत का ? याबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी, दक्षता कमिटी, आशा वर्कर ,डॉक्टर ,नर्स ,अंगणवाडी सेविका, मदतनीस कसून चौकशी करत आहेत तरीदेखील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण गावभर निर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी केली असून समाजप्रबोधनाचे काम सुरू केले आहे. दरम्यान राधानगरी पोलिसांनी शिरगाव गावासह इतर गावावर देखील करडी नजर ठेवली असून गस्त वाढविली आहे.

Related Stories

भाजप- राष्ट्रवादीमध्येच होणार टस्सल?

Patil_p

हर्षनील प्रतिष्ठानची आर्थिक दुर्बलांसाठी धडपड

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : सरपंच आरक्षण सोडत 27 जानेवारीला

Archana Banage

सलिम,सलमान खान प्रकरण; विश्वास नांगरे पाटलांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट

Archana Banage

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे –

Patil_p

कोल्हापूर : अंबपवाडीजवळील खुनाचा उलगडा, पाच आरोपींना अटक

Archana Banage
error: Content is protected !!