Tarun Bharat

शिरहट्टी येथे एका रात्रीत सहा ठिकाणी घरफोडी

रोख रकमेसह सोने लंपास : परिसरात घबराट : पोलीस तपास सुरू

वार्ताहर/ अथणी

शिरहट्टी (ता. अथणी) येथे एकाच रात्रीत सहा ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेत चोरटय़ांनी रोख 1 लाख 13 हजार रुपयांसह सोनेदेखील लंपास केले आहे. या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, गोपाल सनदी यांचे घर, राम सनदी यांची पिठाची गिरण, धृव जोशी, कालाप्पा बडगेर, किरणकुमार नंदेश्वर, अशोक उपाध्ये यांचे दुकान, मल्लाप्पा मिशी, सुवर्णा हळीगेले, रफीक मुल्ला आदींचे घर फोडून चोरटय़ांनी तेथील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. घटनास्थळी डीएसपी एस. व्ही. गिरीश, सीपीआय शंकरगौडा बसगौडर, पीएसआय कुमार हडकर यांनी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत अथणी पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सुरू आहे.

Related Stories

दीड वर्षांनंतर प्राथमिक शाळांची वाजली घंटा

Amit Kulkarni

खून करणाऱया ‘त्या’ दोघांना न्यायालयीन कोठडी

Patil_p

उचगाव शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने दुर्गामाता दौडबाबत मार्गदर्शन

Omkar B

केएलईमध्ये ब्लॅक फंगसवर उपचार सुरू

Amit Kulkarni

अपघातात येळ्ळूरचा तरुण ठार

Patil_p

पारंपरिक खेळण्यांना पोस्टकार्डवर स्थान

Patil_p