Tarun Bharat

शिराळा तालुक्यातील रेड येथे अपघातात दोन ठार

Advertisements

प्रतिनिधी / शिराळा

रेड (ता. शिराळा) येथे डंपर व मोटारसायकल अपघातात कापूरवाडी (ता.वाळवा)  येथील मदन बजरंग कदम (वय 22), स्वप्नील संतोष पाटील (वय 20, रा. शिराळा नाका इस्लामपूर) हे दोन युवक ठार झाले.

ही घटना 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत विनोद प्रकाश कदम यांनी शिराळा पोलिसात  फिर्याद दिली. पोलिसातून समजलेली माहिती अशी, स्वप्नील व मदन हे दोघे मोटारसायकल नंबर एम.एच.10 डी.ए. 0721  वरून इस्लामपूरकडून शिराळ्याकडे निघाले होते. तर खडीने भरलेला डंपर क्रमांक एम.एच.10 बी.आर.678 हा शिराळ्याकडून इस्लामपूरकडे निघाला होता. दरम्यात रेड जिल्हापरिषद शाळे समोरील शिराळा-इस्लामपूर या मुख्य रस्त्याच्या वळणावर डंपर व मोटारसायकल यांची धडक लागली. त्यात मदन जागीच ठार झाला.

तर स्वप्नील यास उपचारासाठी इस्लामपूरकडे नेत असताना त्याचा मृत्यू झाला. त्यांचे शवविच्छेदन शिराळा येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. स्वप्नील याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजी असा परिवार आहे. तो आर.आय.टी.मध्ये मेकॅनिकल विभागात तिसऱया वर्षाला शिकत होता. मदनचे वडील अपंग आहेत. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने तो इस्लामपूर येथे खासगी हॉस्पिटलमध्ये कामाला होता. त्याच्या पश्चात वडील, आई, एक लहान भाऊ असा परिवार आहे.

Related Stories

सांगलीत पावसाची उसंत, पुराने हाहाकार

Abhijeet Shinde

उजनी धरणाचा मृत साठ्य़ात प्रवेश

Abhijeet Shinde

सांगली : शेडगेवाडीतील चोरी प्रकरणातील फिर्यादीच निघाला चोर

Abhijeet Shinde

सांगली : मिरजेत सामुहिक नमाज पठण, ४१ जणांवर गुन्हा

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात 1280 नवे रूग्ण, 24 जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

मिरजेत गीताजयंती निमित्त ५०० ग्रंथाचे वितरण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!