Tarun Bharat

शिराळ्यात तेरा हजारांची ऑनलाईन फसवणूक

प्रतिनिधी / शिराळा


सागाव ता. शिराळा येथील शिवाजी पांडुरंग पाटील यांची एका अज्ञात इसमाने 13 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. याबद्दल शिराळा पोलिसात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, शिवाजी पाटील यांनी ॲमेझॉन ॲपद्वारे मोबाईल आणि मोबाईल कव्हरची ऑनलाईन मागणी केली होती. यानंतर त्यांना एक निनावी फोन आला आणि मोबाईल बद्दल माहिती देताना ,बॅक खाते नंबर आणि इतर तपशील विचारण्यात आला. बोलण्याच्या ओघात ओटीपी ची मागणी करण्यात आली. ही चूक त्यांच्या लक्षात न आल्याने त्यांची तेरा हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. याबाबत त्यांनी शिराळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील करत आहेत.

Related Stories

वाघवाडी-शिवपूरी रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत चिमुरडा ठार

Archana Banage

सांगली : त्यांनी लॉकडाऊन काळात लिहिली संपूर्ण ज्ञानेश्वरी

Archana Banage

सांगली : जाचक व चूकीची उपभोगकर्ता करप्रणाली रदद् करा

Archana Banage

लवकरच कोल्हापूर झेडपीच्या निवडणुका! ‘हा’ कार्यक्रम झाला जाहीर

Rahul Gadkar

सांगली : मिरजेत किरकोळ कारणातून मध्यरात्री घरात घुसून मारहाण करत वस्तूंची तोडफोड

Archana Banage

सांगली : हुमा घुबड तस्करी प्रकरणी स्टिंग ऑपेरेशन करून पाच आरोपींना रंगे हात पकडले

Archana Banage