प्रतिनिधी /फोंडा
दाबोली-शिरोडा येथील एका जनरल स्टोअरवर फोंडा पोलिसांनी छापा टाकून 160 लिटरचा सुमारे 31 हजार रूपये किमतीचा विनापरवाना बेकायदेशीरित्या साठवून ठेवलेला दारूसाठा जप्त केला. याप्रकरणी दिनू जीरू नाईक याला ताब्यात घेतले आहे. आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दाभोली शिरोडा येथील दिपू जनरल स्टोअर्स मध्ये विनापरवाना दारू विकण्यात येत असल्याची टीप फोंडा पोलिसांना मिळाली होती त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. कारवाईअंतर्गत विविध ब्रन्डची बियर, रम, ब्रेन्डीसह सुमारे 160 लिटरची रू. 31 हजार किमतीची दारू जप्त करण्यात आली. फोंडा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक विभीनव शिरोडकर, साजिद पिल्ले, आदित्य वेळीप, सुरज काणकोणकर, केदारनाथ जल्मी, शामसुंदर शिवोलकर यांनी ही कारवाई केली. विधानसभा निवडणूकासाठी धर्तीवर आचारसंहिता लागू झाल्याने फोंडा पोलिसांनी बेकायदेशीरित्या साठवणूक करीत असलेल्या दारू अड्डय़ावर धाडसत्र आरंभलेले आहे.