Tarun Bharat

शिरोली एमआयडीसीत चारशेहून अधिक उद्योग पायाभूत सुविधांपासून आज ही वंचितच

Advertisements

सुरेश पाटील / पुलाची शिरोली

शिरोली एमआयडीसीत असूनही एमआयडीसी मध्ये समाविष्ट नसणारे चारशेहून अधिक लघु व सुक्ष्म उद्योग पायाभूत सुविधांपासून अनेक वर्षांपासून आजही वंचित आहेत. कोल्हापूर एक्सल कंपनीच्या पाठीमागे शिरोली येथील शर्यतीचा माळ व साउंड कास्टिंग समोरील वसाहत परिसरातील सुमारे चारशे उद्योगांची कोणत्याही प्रकारची सेवा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अत्यंत वाईट अवस्था आहे.

या दोन्ही ठिकाणच्या लघु वसाहतीतील कारखाने औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) हद्दीत नसल्याने महामंडळ तेथे कोणत्याही सेवा सुविधा देत नाही. फाळा(कर) स्वरूपात पुलाची शिरोली ग्रामपंचायत शर्यतीचा माळ व साउंड कास्टिंग समोरील वसाहत येथील प्रतिवर्षी सुमारे वीस लाख रुपयांची कर आकारणी करुन शंभर टक्के वसुली करते. पण मतांच्या बेरजेचे राजकारण येथे नसल्याने ग्रामपंचायत प्रतिनिधी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. याबाबत दाद कुणाकडे मागायची? या विवंचनेत तेथील उद्योजक आहेत.
आम्ही सर्व प्रकारचे कर वेळेत भरतो, तरीही मुलभूत सुविधांपासून वंचित का ? ग्रामपंचायत आम्हाला सुविधा देणार नसेल, तर शासनाने औद्योगिक विकास महामंडळाच्या हद्दीत या उद्योगांचा समावेश करावा आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी स्थानिक लघु उद्योजक करत आहेत.

पायाभूत सुविधा नसल्याने काही उद्योग स्थलांतरित झाले. रस्ते चांगले नसल्याने माल वाहतूक करणारी वाहने येथे येण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे वेळेत मालाचा पुरवठा करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. येथे सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी कोठेही गटर बांधकाम नसल्याने काही ठिकाणी रस्त्यांनाच गटारीचे स्वरुप आले आहे. परिणामी दुर्गंधी पसरुन मालक व कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.तसेच पथदिवे नसल्याने रात्री उशिरा कामावर ये – जा करणाऱ्या कामगारांची मोठी गैरसोय होत आहे. सुविधा नाहीत म्हणून फाळाही थकवून चालत नाही. कारण असेसमेंट, सातबारा, आदी बँकेसाठी लागणार्‍या कागदपत्रांमध्ये अडवणूक केली जाते.
शिरोली औद्योगिक वसाहतीच्या स्थापनेला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. फौंड्री हा शिरोली औद्योगिक वसाहतीचा मुख्य उद्योग मानला जातो. फौंड्री मध्ये तयार होणारे कास्टिंग वाहनांच्या स्पेअर पार्ट मध्ये रूपांतरीत करणारा इंजीनियरिंग उद्योग येथे मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे. उद्योगाची गरज म्हणून शिरोली, नागाव, टोप व शिये या गावातील शेकडो तरुणांनी लेथ मशिनच्या माध्यमातून उद्योजक होण्याचे स्वप्न रंगवले आहे.

त्यामुळे औद्योगिक वसाहतीमधील साउंड कास्टिंग समोरील शिरोली ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणार्‍या विस्तीर्ण जागेत दोनशेहून अधिक लघु व सुक्ष्म उद्योग उभे राहिले आहेत. या उद्योगांनाही आता पंचवीस वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. पण अद्यापही तेथे रस्ते, पथदिवे, पाणी आदी पायाभूत सुविधांची वानवा आहे. या दोन्ही ठिकाणच्या उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार्‍या ‘स्मॅक’लाही अद्याप याचे उत्तर सापडलेले नाही. वीस वर्षांहून अधिक काळ उद्योजक या ठिकाणी उद्योग करत आहेत. पण रस्ते, लाईट, पाणी या पायाभूत सुविधांसाठी त्यांना कोणी वालीच राहिलेला नाही का? तसेच कारखानदार व कामगार यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. उद्योजक ‌बाळासो पाटील – तुषार इंजिनिअर्स.

Related Stories

स्वाभिमानीची आज ऊस परिषद

Abhijeet Shinde

कोल्हापुरी कलेचा फिल्मफेअरने सन्मान

Abhijeet Shinde

‘मोफत उज्वला गॅस’च्या नावाखाली लूट

Sumit Tambekar

कोल्हापूर जिल्ह्यात कोव्हॅक्सिनची पहिली लस 77 वर्षीय माजी सैनिकाला..!

Abhijeet Shinde

बहिरेवाडीत मद्यसाठ्यावर छापा : मारूती कारसह अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त

Abhijeet Shinde

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवारांची पक्षातून हकालपट्टी करा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!