Tarun Bharat

शिरोली औद्योगिक वसाहतीत ट्रक चालकाची आत्महत्या

वार्ताहर / पुलाची शिरोली

शिरोली औद्योगिक वसाहतीतील एका पेट्रोल पंपाजवळ झाडाला गळफास घेऊन ट्रक चालकाने आत्महत्या केली. ओंकार भगवान इंदुलकर वय वर्षे २५. रा. मालेवाडी ता. वाळवा जि. सांगली असे त्याचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आली.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, ओंकार हा मालेवाडी येथील जाधव यांच्या मालवाहतूक ट्रकवर ड्रायव्हरचे काम करीत होता. शनिवारी तो शिरोली एमआयडीसीत आला होता. गाडीला लोड नसल्यामुळे तो एमआयडीसी भागात ट्रक थांबवून राहिला होता. दरम्यान, रविवार रात्री त्याने पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या एका झाडास दोरी बांधून गळफास घेतला. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. ह्या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे. स. पो. नि. किरण भोसले व फौजदार अतुल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Related Stories

मोक्का न्यायालयाकडून तेलनाडे बंधू फरार घोषित

Archana Banage

कोल्हापूर : कायमस्वरुपी गणेशमूर्तीतून पर्यावरणाचा जागर

Archana Banage

Kolhapur : उत्रेत गव्याच्या कळपाकडून पिकांचे नुकसान; शेतकरी हवालदिल

Abhijeet Khandekar

अलमट्टीच्या उंचीला विरोध करणार..!

Abhijeet Khandekar

कोरोना काळात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा मिळाव्यात

Archana Banage

मराठी साहित्य संमेलनाचा लोगो बनला कोल्हापुरात

Archana Banage