Tarun Bharat

शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील अपुऱ्या सुविधा पूर्ण कराव्यात

प्रतिनिधी / कसबा बीड

करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला  येथील प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली दु येथील केंद्रात अपुऱ्या सोयीसुविधा  पुरविणेबाबत “केक कापून व एक डझन  मेनबत्ती”निवेदनाद्वारे देवुन आझाद हिंद संघटनेचे संघटना प्रमुख मा.मुकुंद पाटील यांनी निवेदन देऊन  मागणी केली.

करवीर पश्‍चिम भागात महापुरामध्ये रस्त्यांवर पाणी येते व सर्व वाहतुकीचे पुल पाण्यामध्ये जातात. त्यामुळे कोल्हापूरशी या भागांचा संपर्क तुटतो. त्यामुळे आरोग्यविषयक तक्रारी उद्भवल्यास या भागामध्येच जे दवाखाने आहेत. तिथेच पेशंटला जावे लागत, पण कमी प्रमाणात आजार असल्यासच तिथे उपचार होतात. या काळात सर्पदंश वन्य प्राणी व वन्य प्राण्यांपासून नागरिक अत्यवस्थ  होतात.

त्यावेळी त्यांना या प्राथमिक आरोग्य केंद्र शिवाय दुसरा पर्याय नसतो. 2019 ला महापूर आला त्यावेळी  विद्युत व्यवस्था व इतर व्यवस्था पूर्ण ठप्प झाल्याने याचा फटका या प्राथमिक केंद्राला झाला. त्यावेळी महिलांचे  कित्येक बाळंतपण मेणबत्ती व बॅटरी लावून करण्यात आली. औषधे व लसी खराब होत गेल्या. या दिवे निवेदनामध्ये खालील प्रमुख मागण्या पूर्ण कराव्यात असे सांगितले.

१)या केंद्रामध्ये जनरेटरची सोय इन्वर्टरस किंवा सोलर विद्युत पुरवठा  हा बंद होता, तो सध्या ही नादुरुस्त आहे. गेली एक वर्षे होऊन सुद्धा नवीन पर्यायी व्यवस्था केलेली नाही.

२)सिरीयस पेशंट कोल्हापूर सारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी किंवा पुढील उपचारासाठी रुग्ण पोचवण्यासाठी ॲम्बुलन्सची गरज असते ,पण येथे 102 टाटा सुमो ॲम्बुलन्स सध्या कार्यरत आहे. पण ती खराब आवस्थेत असल्याने आरोग्य केंद्रास 108 ऍम्ब्युलन्स मिळणे गरजेचे आहे.

३)येथे कॉम्प्युटरची सेवा खंडित आहे. ते नादुरुस्त आहेत. त्यामुळे पेशंटची माहिती भरणे किंवा पुढील हॉस्पिटलला माहिती पुरवणे तसेच शासनाचे महत्त्वाच्या नियमांचे माहिती व्हावे यासाठी ही सेवा सुरु होणे महत्त्वाचे आहे.

४)कोरोना रोगामध्ये या सर्व डॉक्टर्स नर्सेस व कर्मचारी यांना चांगले दर्जाचे किट्स व इतर व्यवस्था पुरवावी
या व इतर मागण्या आज डॉक्टर सौ मोरे मॅडम यांना निवेदनाद्वारे दिले.यावेळी सौ विजयमाला कृष्णात पाटील, मा राहुल बिडकर, मा.शंभुराजे मोहिते, मा.कुंडलिक पाटील शिरोलीकर ,मा प्रशांत कृष्णात पाटील मा,सुनील पाटील व इतर हजर होते.

Related Stories

सभागृहात कार्यकर्त्यांना शांत करताना अजित पवार म्हणाले, समिती ठरवेल ते शरद पवारांना मान्य

Archana Banage

फुले दांपत्यांचे कार्य ऊर्जा व प्रेरणा देणारे

Patil_p

निर्णय घेण्याचे अधिकार लोकप्रतिनिधींकडे द्या

Patil_p

…तर `त्यांच्याच’ शैलीतच ठोकून काढू; चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्री ठाकरेंना इशारा

Archana Banage

चिन्ह आणि नाव मिळविण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा

datta jadhav

दारुच्या नशेत सख्या भावाचा खून

Patil_p
error: Content is protected !!