Tarun Bharat

शिरोळमध्ये जुगार अड्यावर छापा सात जण ताब्यात

प्रतिनिधी / शिरोळ

शिरोळ येथील नंदिवली रोड लक्ष्मीनगर येथे बेकायदेशीर तीन पानी जुगार खेळत असताना सात लोकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले असून एक लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नंदिवली रोड लक्ष्मीनगर येथील सुभाष कांबळे यांच्या शेतातील झाडाखाली संशयित आरोपी सुभाष कांबळे, सुहास आवळे, अनिल माने, विलास माने,  गणेश शिरोळ कर,  सतीश वायदंडे व अवधूत भोरे  या सात जनांनी बेकायदेशीर तीन पानी जुगार खेळत होते.

कोरोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून  शासनाने जमावबंदी आदेश लागू केला आहे असे असताना  तीन पानी जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले त्यांच्याकडून रोख तेवीसे  रुपये, तीन मोटरसायकल,व जुगाराचे साहित्य असा एक लाख 23 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सात लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे सदरची वर्दी पो कॉ गजानन कोष्टी यांनी दिली आहे पुढील तपास पोलिस हवालदार डी डी सानप हे करीत आहेत.

Related Stories

कॉलेज परिसर फुलला..

Archana Banage

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी – समरजितसिंह घाटगे

Archana Banage

निवडणुकीच्या वादातून दंगल; धबधबेवाडीत सात जणांना पोलीस कोठडी

Archana Banage

कर्नाटक विधानसभा निवडणूकीसाठी ओवेसींनी जाहीर केली 3 उमेदवारांची पहिली यादी

Abhijeet Khandekar

कोल्हापूर जिल्हय़ात सायंकाळपर्यंत 35 कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

बहिरेश्वरच्या सरपंचपदी युवराज दिंडे यांची बिनविरोध निवड

Archana Banage