Tarun Bharat

शिरोळमध्ये दररोज 400 निराधारांना जेवणाची सोय

प्रतिनिधी/शिरोळ

उद्योगपती संजय घोडावत फौंडेशन माध्यमातून पृथ्वीराजसिंह यादव यांनी शिरोळ शहरात 400 गरजू व निराधारांना दररोज तयार जेवणाची व्यवस्था केली आहे. यामुळे अनेकांना गरजुंना आधार मिळाला आहे.

शिरोळ शहरातील विविध भागात गोर गरीब व निराधार व्यक्तींना लॉकडाउनमुळे हाताला काम नसले मुळे त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येवू नये म्हणून पृथ्वीराजसिंह यादव यांनी घोडावत फौंडेशन यांच्याशी संपर्क करुन या गरजु लोकांची तयार फूड पॅकेट द्वारा जेवणाची व्यवस्था केली आहे. विविध कार्यकर्ते व भाजप नगरसेवक यांच्या मदतीने गरजु लोकांपर्यंत घरपोच फूडपॅकेट पोहच केले जातात.

यात नगरसेवक अरविंद माने, श्रीवर्धन माने देशमुख, दादा कोळी, विराज यादव, गजानन संकपाळ, विजय आरगे, इम्रान अत्तार, प्रदिप भोसले, पंडीत काळे आदी युवा मोर्चाचे कार्यकर्ते सेवा बजावतात.

गरजूंना मदतीची गरज असल्यास नगरसेवक श्रीवर्धन माने- देशमुख यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी 99 60 93 75 73 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे माने यांनी आवाहन केले.

Related Stories

शिंगणापूर बंधाऱ्यावर दुचाकी घसरुण एकजण गेला वाहून, शोध सुरू

Archana Banage

सातारा : दिवसभरातील 37 जणांसह जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे चौथे शतक

Archana Banage

कोल्हापूर: विवेकानंद कॉलेज, जिल्हाधिकारी कार्यालय, सीपीआर चौकात गव्याचे दर्शन

Archana Banage

केखले येथे गोठ्यास आग, सुमारे पावणेदोन लाखांचे नुकसान

Archana Banage

दीड वर्षांनी मार्केटची 1200 कोटींची भरारी !

Archana Banage

फ्लॅट देण्याचे सांगून लाखो रूपयांची फसवणूक करणारा गजाआड

Patil_p