शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक शोध घालत असताना केपीटी चौकात मोटरसायकल चोरट्यास ताब्यात घेतले. यावेळी आकाश कांत कोळी (वय 27) राहणार कोळी गल्ली याने नृसिंहवाडी येथून मोटरसायकल चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे एसटी स्टँड जवळ त्याला अटक करून चोरीची मोटारसायकल जप्त केली.
नृसिंहवाडी येथील जगदाळे कॉलेज समोर ऊसतोड मजुराची मोटरसायकल क्रमांक क्रमांक एमएच 13 एम 80 89 ही मोटरसायकल आकाश कोळी याने चोरून नेली होती. आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास केपीटी चौकात मोटरसायकसह त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपनिरिक्षक नवनाथ सुळ पोलीस नाईक हनुमंत माळी पोलीस कॉन्स्टेबल ताहीर मुल्ला, गजानन कोष्टी, सागर खाडे, प्रियांका कदम यांच्या पथकाने केली. अधिक तपास पोलिस नाईक काळेलकर हे करीत आहेत


next post