Tarun Bharat

शिरोळमध्ये धुतलेल्या कपड्याचे पाणी अंगावर उडल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

शिरोळ / प्रतिनिधी

धुतलेल्या कपड्याचे पाणी अंगावर उघडण्याच्या कारणावरून भोसले व खलीप यांच्यात हाणामारी होऊन दोन्ही गटाकडील चौघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी परस्पर विरोधी पोलिसात फिर्याद दाखल रात्री उशिरा करण्यात आली.  
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की  शिरोळ नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. कविता भोसले यांच्या जाऊ सौ. कोमल संभाजी भोसले या सार्वजनिक कुपनलिकेवर कपडे धुऊन वाळत घालण्यासाठी झाडताना यास्मिन आतारवाले यांच्या अंगावर पाणी पडल्याच्या कारणावरून संशयित आरोपी यास्मिन आत्तारआले, शकील खलिफ, ,शाहरूख खलीप , राजू खलिफा,  शमा खलिफ व शाहीर खलिफ यांनी फिर्यादी  यांना शिवीगाळ व मारहाण केली. यावेळी नगरसेविका कविता भोसले, प्रदीप भोसले, संभाजी भोसले  यांनी भांडण सोडवण्यासाठी  गेले असता त्यांनाही अश्लील  शिवीगाळ मारहाण करून सोन्याची चेंन लंपास केली आहे. तर लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे 

यास्मिन आत्तारआले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की संभाजी भोसले ,प्रदीप भोसले ,कविता भोसले व कोमल भोसले यांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली आहे तसेच लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य  केले आहे. रात्री उशिरा परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आली असून  पोलिस निरीक्षक शिवानंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ ज्ञानेश्वर सानप हे अधिक तपास करीत आहेत    

Related Stories

कोल्हापूर : कोडोलीत लोकमान्यच्या रांगोळी स्पर्धात तनूजा महाडिक प्रथम

Archana Banage

कोल्हापूर : मांगले-काखे पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू

Archana Banage

गोकुळमध्ये सत्तांतर! सतेज पाटील-मुश्रीफ गटाची 17-4 ने बाजी

Archana Banage

कबनुरात वॉलपुट्टी कामगाराचा मृत्यू

Archana Banage

कोल्हापूर : मुद्रांक शुल्कातून दिलासा, रेडिरेकनचा दणका

Archana Banage

तीस वर्षांपूर्वीची रहिवासी अतिक्रमणे कायम करणार

Archana Banage
error: Content is protected !!