Tarun Bharat

शिरोळ उपनगराध्यक्षपदाची निवडणूक २४ जानेवारीला

प्रतिनिधी / शिरोळ

शिरोळ नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड येत्या 24 जानेवारीला होणार आहे. उपनगराध्यक्ष योगेश पुजारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

येत्या शुक्रवारी सकाळी 10 ते 12 या कालावधीत नामनिर्देशन पत्र सादर करणे, छाननी उमेदवारी अर्ज मागे घेणे, दुपारी एक वाजता उपनगराध्यक्ष पदासाठी निवड जाहीर करणे, असा निवडणूक कार्यक्रम असणार आहे. नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही खास सभा होणार आहे. या नगर परिषदेमध्ये शाहू आघाडीचे ९ तर भाजपची ७ सदस्य संख्या असून उपनगराध्यक्ष पदासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश गावडे यांची निवड निश्चित मानली जाते. या सभेच्या सर्व सदस्यांना नोटिसा लागू करण्यात आल्या आहेत. या उपनगराध्यक्ष पदाची निवड बिनविरोध होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे

Related Stories

जीव मोलाचा नको निर्णय टोकाचा

Archana Banage

स्वयंभूवाडी येथे नागपंचमी यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी

Abhijeet Khandekar

मराठी साहित्य संमेलनाचा लोगो बनला कोल्हापुरात

Archana Banage

चंद्रकांत पाटलांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून पालकमंत्र्यांना टार्गेट : हसन मुश्रीफ

Abhijeet Khandekar

राजाराम कारखाना 122 गावातील सभासदांचा आहे, तसाच राहणार- अमल महाडिक

Abhijeet Khandekar

उसने पैसे परत मिळत नसल्याच्या नैराश्येतून तरुणाची आत्महत्या

Archana Banage