Tarun Bharat

शिरोळ तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने मोर्चा

शिरोळ /  प्रतिनिधी
 

केंद्र शासनाने  कामगार व शेतकरी विरोधी केलेले कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी शिरोळ तालुका काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.  यावेळी दोन्ही विद्ययके रद्द करा या मागणीचे निवेदन तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांना  देण्यात आले. दरम्यान, यावेळी उत्तरप्रदेश सरकारचाही निषेध व्यक्त करण्यात आला.
     

काँग्रेसचे नेते, दत्त उद्योग समुहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. केंद्र शासनाने कृषी विधेयकाचे रुपांतर कायद्यात करुन देशातील ९० टक्के शेतकºयांना गुलामीत ढकलले आहे. कायदा करुन संपूर्ण शेती भांडवलदार व व्यापाºयांना खुली केली आहे.  या दोन्ही कायद्यांना आमचा विरोध असून केंद्र शासनाने ही विधेयके रद्द करावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे, गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, शेखर पाटील, रणजित पाटील, संजय पाटील-कोथळीकर, मुसा डांगे, तातोबा पाटील, महेश परीट, शितल उपाध्ये यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related Stories

महाराष्ट्र एक महान राज्य : राष्ट्रपती कोविंद

datta jadhav

देश अन् समाजाशी अतुट नाळ असलेला शास्त्रज्ञ

Abhijeet Khandekar

शिवसेनेमुळे निजामाच्या औलादींची महाराष्ट्रात वळवळ : राज ठाकरे

Abhijeet Khandekar

जिल्हय़ात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढली

Patil_p

Kolhapur : ‘जन लोकायुक्त’साठी पुन्हा ‘रण’

Abhijeet Khandekar

पत्रकारांना पन्नास लाखाचे विमा संरक्षण

Archana Banage