Tarun Bharat

शिरोळ तालुक्यातील सरपंच निवडणुका पुढे गेल्याने इच्छुकांची घालमेल वाढली

प्रतिनिधी / शिरोळ

शिरोळ तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या आहेत. शिरटी व मजरेवाडी या दोन गावच्या आरक्षण वगळून आणि 31 गावच्या सरपंच पदाची निवड ठरलेल्या नऊ फेब्रुवारी होईल. असे वाटत असतानाच तालुक्यातील सर्व 33 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुका 16 फेब्रुवारी पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

शिरोळ तालुक्यातील 53 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण नुकतेच काढण्यात आले. या आरक्षणाविरोधात शिरटी येथील नुतन ग्रामपंचायत सदस्य भंडारे यांनी सरपंच पदांसाठी काढण्यात आलेले आरक्षण हे चुकीचे असुन त्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने शिरटी  व मजरेवाडी या दोन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीसाठी  स्थगिती दिली होती.
शिरोळ तालुक्यातील नुकत्याच झालेल्या 33 ग्रामपंचायती पैकी 31 ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच पदासाठी नऊ फेब्रुवारी रोजी निवडी होतील असे वाटत असताना आज जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच निवड या सोळा तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आले असल्याचे स्पष्ट झाल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे.

या तालुक्यातील  33 ग्रामपंचायतींच्या पैकी बहुसंख्य नूतन सदस्यांना दगाफटका होऊ नये म्हणून सहलीवर पाठवण्यात आलेले आहेत. पुन्हा सोळा तारखेपर्यंत सरपंच पदाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने इच्छुकांची घालमेल वाढली असून आहे. ती सरपंच पदाचे आरक्षण राहणार की पुन्हा नव्याने सोडत होणार चर्चा रंगली आहे.

Related Stories

कोल्हापूर : ‘सौ चुहे खाके..’ सारखी भाजप प्रदेशाध्यक्षांची स्थिती

Archana Banage

चर्चा ‘कोरोना’ची, मृत्यू अन्य कारणाने

Archana Banage

लमान बंजारा मेळाव्यात विविध मागण्यांचे ठराव एकमताने मंजूर

Abhijeet Khandekar

सोन्यांच बाशिंग अन लगीन देवाचं लागलं…

Archana Banage

कोल्हापूर : कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्काराची रक्कम देण्यास पालिकेकडून टाळाटाळ

Archana Banage

कोल्हापूर : महसूल सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधकच्या जाळ्यात

Abhijeet Khandekar