Tarun Bharat

शिरोळ तालुक्यात आठ दिवसात सहा जणांचा बळी

गतिरोधक नसल्याने होत आहेत वारंवार अपघात, सार्वजनिक बांधकाम विभाग व समितीचे दुर्लक्ष

प्रतिनिधी / शिरोळ

शिरोळ तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभाग व समितीचे दुर्लक्षामुळे गेल्या आठ दिवसात सहा लोकांचा बळी गेला आहे. याला जबाबदार कोण वारंवार मागणी करूनही ठीक ठिकाणी गतिरोधक न केल्याने वारंवार अपघात घडत आहेत शिरोळ शहरातील सर्वच तरुण मंडळ व सेवाभावी  संस्थेच्या कार्यकर्त्यांनी उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. 

गेल्या दोन वर्षापासून श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना ते जनता हायस्कूल या मुख्य मार्गावर नऊ ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी केली जात आहे. याकरिता यापूर्वी आंदोलने करण्यात आली आहेत. नुकतेच पद्माराजे विद्यालय समोर दोघांचा बळी गेला आहे तर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर मोटरसायकलच्या धडकेत इसमाचा मृत्यू झाला. ऊस गळीत हंगाम सुरू असून ऊस वाहतूक की बरोबर शेकडो वाहनाची दररोज वर्दळ आहे. तहसीलदार कार्यालय समोर रस्ता पास करणेदेखील मुश्किल झाले आहे तर पद्माराजे विद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे तसेच जय भवानी चौक बसवेश्वर चौक घालवाड फाटा शिरटी फाटा नांदणी रोड व आगर भाग या ठिकाणी गतिरोधक बसविणे गरजेचे आहे.

लवकरच बैठक घेत तीव्र आंदोलनाचा शिरोळकरांचा इशारा

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता बागवान हे साधा फोनही घेत नसल्याने कार्यकर्त्याकडून नाराजी उमटत असून त्यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे त्यांच्या कार्यकाळात सुरू असलेल्या कामाची चौकशी पुण्याच्या क्वालिटी कंट्रोल रूम ने करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Related Stories

‘पंधराव्या वित्त’मधून जिल्ह्यासाठी 32 कोटी

Abhijeet Khandekar

कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील विजेची तार तुटल्याने वाहतूक ठप्प

Archana Banage

शेतकरी, ग्राहकांची लूट; अडते, व्यापारी गलेलठ्ठ

Archana Banage

कोल्हापूर : जिल्हय़ात कोरोनाचे 11 बळी, 548 पॉझिटिव्ह रूग्ण

Archana Banage

Kolhapur : अंगणवाडी कर्मचारी 20 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर

Abhijeet Khandekar

Kolhapur : मित्रांनीच केला मित्राचा खून; अपमानास्पद वागणूक दिल्याने काढला काटा

Abhijeet Khandekar