Tarun Bharat

शिरोळ तालुक्यात चिकनगुनिया, डेंग्यूचे थैमान

Advertisements

आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

प्रतिनिधी / शिरोळ

शिरोळ तालुक्यात दिवसेंदिवस चिकुनगुनियाबरोबरच डेंग्यूचीही साथ झपाट्याने वाढू लागली आहे. बहुसंख्य दवाखणे हाउसफुल आहेत. गेल्या चार-पाच महिन्यांपासून तालुक्यात कोरोना विषाणूने थैमान मांडले होते. तालुक्यात अनेक लोकांचा बळी गेला. गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला असताना आता पुन्हा या चिकन गुनिया व डेंग्यूच्या साथीने डोके वर काढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. यावर उपाय म्हणून तातडीने औषध फवारणी करण्याची मागणी नागरिकांच्यातून होत आहे.

गेल्या दहा बारा दिवसांपासून नागरिकांना थंड, ताप व स्नायू दुखण्याच्या त्रासाने नागरिक हैराण झाले आहेत. शिरोळ, घालवाड, कुटवाड,कवठेगुलंद, शेडशाळ,उदगाव, अर्जुन वाढ, चिंचवाड हसुर जांभळी टाकळीवाडी, दत्तवाड,धरणगुत्ती, यड्राव, शिरटी यासह अन्य गावांमध्ये ही साथ मोठ्या प्रमाणावर पसरु लागली आहे.

शिरोळ येथील डॉ. विशाल चौगुले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, गेल्या दहा-बारा दिवसापासून मोठ्या प्रमाणात चिकन गुनियाची साथ सुरू झाली आहे तसेच डेगुचाही कांहीं भागात झाला आहे. कोरोनाबाधिताची संख्या कमी झाली असली तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी चिकन गुनिया व डेंग्यू आजारांवर वेळीच उपचार घेतले तर धोका टळू शकतो नागरिकांनी आपापला परिसर स्वच्छ ठेवा पाणी उकळून घेण्यचे आवाहन त्यांनी केले.

Related Stories

पाचव्या बालचित्रपट महोत्सवाच्या शुभंकराचे अनावरण; 2500 विद्यार्थी होणार सहभागी

Abhijeet Shinde

पोस्टल कॉलनी पाचगाव येथे आढळले तीन पॉझिटिव्ह रुग्ण

Abhijeet Shinde

कोल्हापूर : विवाहितेच्या छळप्रकरणी गडमुडशिंगीतील सहा जणांवर गुन्हा

Abhijeet Shinde

ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्यास परवानगी , मुदतही वाढली

Abhijeet Shinde

Kolhapur : आळते गावात लंम्पीस्कीन रोगाचा शिरकाव; तातडीने लसीकरणाची गरज

Abhijeet Khandekar

राज ठाकरे कोणाची बी टीम म्हणून काम करणार नाहीत – चंद्रकांत पाटील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!