Tarun Bharat

शिरोळ नगरपरिषदेच्या नगरसेवक पदी शरद मोरे यांची निवड

Advertisements

प्रतिनिधी / शिरोळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  शिरोळ नगरपरिषदेच्या  स्वीकृत नगरसेवक पदाची निवड सभा प्रथमच  व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे  शुक्रवारी पार पडली , यामध्ये शाहू आघाडीचे शरद उर्फ बापू सुरेशराव मोरे यांची स्वीकृत नगरसेवक पदी एकमताने निवड करण्यात आली, या सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील होते.

नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक पद्मसिंह पाटील यांनी आघाडी अंतर्गत ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला होता या रिक्त जागेवर शरद मोरे यांची निवड करण्यात आहे.
      
 20 मार्च रोजी ही निवड होणार होती परंतु कोरोनाविषाणू च्या पार्श्वभूमीवर ही निवड प्रक्रिया तहकूब करण्यात आली होती  प्रांताधिकारी डॉ विकास खरात यांची शिफारस नगरपरिषदेला प्राप्त झाल्यानंतर  शुक्रवारी स्वीकृत नगरसेवक पदासाठी सभा झाली, प्रारंभी मुख्याधिकारी तैमूर मुलांनी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे निवडणूक प्रक्रिया प्रारंभ  करून नगरसेवकांचे  स्वागत केले, शिरोळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष  व शाहू आघाडीचे  कार्यकर्ते  शरद उर्फ बापू मोरे  यांचा स्वीकृत नगरसेवक पदासाठी  एकमेव अर्ज दाखल झाल्याने   एकूण 17 पैकी 15 नगरसेवकांनी हजेरी दाखवून व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे शरद मोरे  यांची एक मताने निवड केली.
 
यावेळी सर्व नगरसेवकांनी नूतन नगरसेवक मोरे यांना अभिनंदन केले, दरम्यान, या निवडीनंतर नूतन नगरसेवक बापू मोरे म्हणाले , शिरोळ नगरपरिषदेच्या  कामकाजात  सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन  मी काम करणार आहे ,आपणास मिळालेल्या संधीचा उपयोग  जनहितासाठी करणार असल्याचे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, यांनी नूतन नगरसेवक शरद मोरे यांचा  शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

Related Stories

इंधन दरवाढीवर सरसकट केंद्राकडे बोट दाखवू नये – चंद्रकांत पाटील

Archana Banage

कोल्हापूरची कोरोना स्थिती गंभीर

Archana Banage

सातारा-पंढरपूर बसवर दरोडेखोरांची दगडफेक

Patil_p

बजरंग पाटील, सर्जेराव पाटील, शिंपी स्पर्धेतून बाहेर

Kalyani Amanagi

गोकुळ निवडणूक : माजी आमदार सत्यजित आबांची घरवापसी

Archana Banage

बाजार समितीच्या कारभाराची पालकमंत्र्यांकडून दखल

Archana Banage
error: Content is protected !!