Tarun Bharat

शिरोळ नगर परिषदेच्या विषय समितीच्या सभापती पदाची निवडणूक बिनविरोध

शिरोळ / प्रतिनिधी

येथील नगर परिषदेच्या विषय समितीच्या सभापती पदाची निवडणूक बिनविरोध झाली असून त्यामध्ये चार महिलांना सभापतिपदाची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेत महिलाराज आले आहे. या खास सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ हया होत्या.

या नगरपालिकेच्या विषय समितीच्या सभापतींच्या निवडी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर व आचारसंहितेमुळे त्या लांबल्या होत्या आज पालिकेच्या सभागृहात ऑनलाईन पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. यावेळी सर्व नगरसेवक उपस्थित होते.

दरम्यान नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यावेळी बोलताना म्हणाले, भाजपच्या नगरसेवकांना तांत्रिक बाबींमुळे या निवडीमधये सहभागी होता येत नाही. कारण भाजपने गटनेता न निवडल्याने त्यांना या प्रक्रियेत सहभागी होता येत नाही. मात्र, काही सदस्यांनी विनंती केल्यानुसार प्रत्येक कमिटीमध्ये दोन सदस्य सहभागी करून घेण्यात आले आहेत. सर्वांना विश्वासात व बरोबर घेऊन विकास करणार असल्याचे‌ त्यांनी शेवटी बोलताना सांगितले.

विषय समित्या पुढील प्रमाणे –

स्थायी समिती सभापती – अमरसिंह पाटील, सदस्य – कुमुदिनी कांबळे, सुरेखा पुजारी, राजेंद्र माने, करुणा कांबळे, जयश्री धर्माधिकारी, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती – कुमुदिनी कांबळे, सदस्य – योगेश पुजारी, तातोबा पाटील, डॉ. अरविंद माने, सौ. विदुला यादव, स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती – सौ. सुरेखा पुजारी, सदस्य – कमलाबाई शिंदे, प्रकाश गावडे, श्रीवर्धन माने, देशमुख इमरान आत्तार, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती – राजेंद्र माने, सदस्य – योगेश पुजारी, तातोबा पाटील, डॉ. अरविंद माने, इमरान आत्तार, महिला व बालकल्याण समिती सभापती – करुणा कांबळे, सदस्य – कविता भोसले, कमलाबाई शिंदे, अनिता संकपाळ, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती – जयश्री धर्माधिकारी

Related Stories

कुंभोजमध्ये पाच दिवसांसाठी जनता कर्फ्यू

Archana Banage

दिलासादायक : महाराष्ट्रात मागील 24 तासात 11,077 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

कोल्हापूर : सातार्डेच्या आजीबाईंनी दिला महावितरणला आधार

Archana Banage

अखेर जतमधील चार पोलीस, सात स्वयंसेवकांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Archana Banage

लवकरच कोल्हापूर झेडपीच्या निवडणुका! ‘हा’ कार्यक्रम झाला जाहीर

Rahul Gadkar

Kolhapur : गॅस्ट्रोचा धोका वाढला, आठ लाख लोक जलजन्य आजाराच्या विळख्यात

Archana Banage