Tarun Bharat

शिरोळ पंचायत समितीच्या उपसभापतीपदी शिवसेनेचे संजय माने

शिरोळ/प्रतिनिधी   

पंचायत समितीच्या उपसभापतीपदी शिवसेनेचे संजय मल्हारी माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पीठासन अधिकारी तथा तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ या होत्या. तर गट विकास अधिकारी शंकर कवितके यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

शिरोळ तालुका पंचायत समितीच्या  देशभक्त रत्नाप्पाणणा  कुंभार सभाग्रहात या निवडी पार पडल्या. मावळते उपसभापती मन्सूर मुल्लानी यांनी आघाडी अंतर्गत ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते त्या पदाकरता संजय माने यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध म्हणून घोषित करण्यात आली.

सर्वांना सोबत घेऊन या पुढचा कमी कालावधी असला तरी विश्वासाने तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न करीन अशी प्रतिक्रिया नूतन उपसभापती संजय माने यांनी दिली. यावेळी नूतन उपसभापती  संजय माने यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यापूर्वी उपसभापती संजय माने यांनी 19 महिने उपसभापती तर दोन महिने प्रभारी सभापती म्हणून काम पाहिले आहे.

यावेळी माजी सभापती मल्लापा चौगुले, माजी उपसभापती सचिन शिंदे, मनसुर मुलांनी ज्येष्ठ नेते अण्णासाहेब कोणे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख मधुकर पाटील, तालुका प्रमुख वैभव ऊगळे, तालुका संपर्क प्रकमुख राजाराम सुतार आदींनी आपले मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी सभापती कविता चौगुले, विद्यमान सभापती दिपाली परीट, रूपाली मगदूम, मीनाज जमादार, मल्लू खोत, अण्णासाहेब भिलोरे, सतीश मलमे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Stories

महाविकास आघाडीचा मी गुलाम नाही,चुकणार तिथं बोलणार – राजू शेट्टी

Archana Banage

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात वादळी पाऊस

Archana Banage

वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी

Archana Banage

बावडय़ातील त्या वृद्धेचा दुसरा स्वॅब रिपोर्टही निगेटिव्ह

Archana Banage

कोल्हापुरात सोमवारी रस्ता केला अन् मंगळवारी खोदला !

Archana Banage

Shirala(sangli): अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून मागितली ३ लाखांची खंडणी, वाचा पुढे काय झालं….

Rahul Gadkar