सचिन शिंदे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता
प्रतिनिधी/शिरोळ
येथील पंचायत समितीचे उपसभापती मल्लू खोत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. खोत यांनी राजीनामा दिल्याने या जागी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे यांची निवड निश्चित मानली जाते. पंचायत समितीच्या सभापती कविता चौगुले यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
उपसभापती खोत यांनी आघाडी अंतर्गत ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंचायत समितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी महा विकास आघाडीची सत्ता आहे. आघाडी अंतर्गत ठरल्याप्रमाणे प्रत्येक सदस्यांना सहा महिन्याचा कार्यकाळ देण्यात आला आहे. उपसभापतीपद हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे देण्यात येणार असून सदस्य शिंदे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.