Tarun Bharat

शिरोळ येथे ट्रॅक्टर वरून पडून सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Advertisements

प्रतिनिधी / शिरोळ

येथील शिरटी र्रोड वरील जगदाळे च्या वीटभट्टीवर काम करणारे प्रकाश दोडमनी मुळगाव सालबडी विजापूर कर्नाटक यांचा मुलगा वसंत वय वर्ष सात हा ट्रॅक्टर वरून पडल्याने गंभीर जखमी झाला होता. त्यास उपचाराकरता सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. याबाबत शिरूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की 25 एप्रिल रोजी जगदाळे वीटभट्टीवर प्रकाश दोडमनी हे ट्रॅक्टरवरुन आपल्या मुलगा वसंत यास घेऊन काम करीत असताना मुलाचा तोल जाऊन खाली पडल्याने जखमी झाला होता. त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला सदर घटनेची वर्दी देण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Related Stories

सातारलाही बनावट क्रीडाप्रमाणपत्राच्या संसर्गाची बाधा!

Patil_p

घटनेवेळी मुख्यमंत्री उपस्थित; त्यांनीच स्पष्टता करावी

datta jadhav

दिलासादायक! कोल्हापूर जिल्ह्यात चौथ्या दिवशी कोरोना मृत्यूसंख्या शुन्य

Abhijeet Shinde

नेव्हीच्या सैनिकांना गोकुळच्या दुधाचा `’बुस्ट’

Sumit Tambekar

‘यड्राव’ च्या युवकाने केले विषारी औषध प्राशन

Abhijeet Shinde

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आगमन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!