Tarun Bharat

जांभळी येथे राज्यस्तरीय व्यावसायिक निमंत्रित पुरुष कबड्डी स्पर्धेला प्रारंभ

प्रतिनिधी  / शिरोळ  :

जांभळी, ता. शिरोळ येथील जांभळी क्रीडा मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय व्यावसायिक निमंत्रित पुरुष कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत नामवंत 14 संघानी सहभाग घेतला आहे.

जांभळी क्रीडा मंडळाने यापूर्वीही महिला पुरुष गटाचे भव्य सामने भरवण्यात आले होते. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांचे राहण्याची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रथम क्रमांक विजेत्या संघास एक लाख अकरा हजार रुपये डॉ. आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील स्मृती चषक देण्यात येणार आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या संघाला 75 हजार रुपये क्रमांकाच्या दोन संघांना प्रत्येकी 25 हजार रुपये रोख बक्षिसे दिली जाणार आहेत याशिवाय अनेक वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत.

श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली या र्स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सलग चार दिवस या स्पर्धा होणार असून कबड्डी शौकिनांना ही पर्वणीच लाभली आहे.

या कबड्डी सामन्यांमध्ये एअर इंडिया मुंबई, भारत पेट्रोलियम महिंद्रा अँड महिंद्रा इन्कम टॅक्स पुणे, मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस कस्टम मुंबई, महिंद्रा कोटक मुंबई, बँक ऑफ बडोदा, मुंबई बंदर, रायगड पोलीस, ठाणे महापालिका व महाडिक उद्योग समूह कोल्हापूर या नामवंत संघाचा समावेश आहे

या स्पर्धा जांभळी येथील मैदानावर आयोजित करण्यात आले आहेत या स्पर्धेमध्ये प्रो कबड्डी खेळाडू रोहित राणा सिद्धार्थ देसाई विशाल माने श्रीकांत जाधव नीलेश शिंदे बाजीराव घोडके मयुर शिवतरकर सौरभ पाटील विकास काळे तुषार पाटील महेंद्र रजपूत काशिलिंग आडके अक्षय जाधव पंकज मोहिते आदी नामांकित खेळाडू सहभागी झाले आहेत.

Related Stories

इचलकरंजीत सांडपाणी निचऱ्याचे तीनतेरा; पाणी निचऱ्याचे व्यवस्थापन कुचकामी

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : शिरोळ पंचायत समिती सभापती निवड सहा ऑगस्टला

Archana Banage

कसब्याचा निकाल तुमच्या छाताडावरच पहिलं पाऊल : संजय राऊत

Kalyani Amanagi

सोयाबीन खरेदीतून शेतकऱ्यांची लूट थांबवा

Archana Banage

Sangli; माझा विजय देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या रणनितीमुळे : खा.धनंजय महाडीक

Abhijeet Khandekar

विरोधकांची तयारी असेल तर ‘गोडसाखर’ चालवण्यास घ्यावा

Archana Banage