Tarun Bharat

शिला घडविण्याचे कार्य पुन्हा सुरू

अयोध्येत रामजन्मभूमीच्या स्थानी भव्य मंदिराचे निर्माण कार्य वेगाने सुरू आहे. डिसेंबर 2023 पर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी शेकडो कोरीव शिलांची आवश्यकता आहे. रामघाट येथील रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्यावतीने राजस्थानातून कारागिर आणण्यात आले असून शिला घडविण्याचे काम उत्साहात होत आहे. राजस्थानच्या बन्सीपहाडपूर येथील खाणींमधून तांबडय़ा रंगांचे खडक आणण्यात आले आहेत. रामसेवकपुरम येथील कार्यशाळेतही शिला घडविण्याचे काम करण्यात येत आहे. राममंदिराच्या पायाखोदाईचे काम आता जवळपास पूर्ण होत आले आहे. या मंदिराला चार लाख शिला आवश्यक आहेत.

राजस्थानातून शिलाखंड आणण्यामध्ये काही बाधा निर्माण झाली होती. त्यावेळी अयोध्येत पूर्वीच आणून ठेवलेले शिलाखंड घडविण्यासाठी देण्यात आले. त्यामुळे कामाचा वेग कायम राहिला आहे. मात्र, अजूनही शेकडो कारागिरांची आवश्यकता असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. भारताच्या प्रत्येक प्रांतातून शिला घडविणारे कारागिर आणण्याचा विचार आहे. प्रस्तावित राममंदिराच्या निर्माण कार्यात भारतातील प्रत्येक समाजाचे लोक सहभागी व्हावेत, हा उद्देश आहे.

Related Stories

नवनियुक्त लेफ्टनंट दिपाली गावकर यांचा करण्यात आला सत्कार

Anuja Kudatarkar

चिंतनशील साहित्यिक

Patil_p

स्वतःसाठी खोके तर शेतकऱ्यांना धोके देणारे हे सरकार आहे; आ. आदित्य ठाकरे

Archana Banage

नववर्षात रेल्वेप्रवास महागला

Patil_p

मुख्यमंत्री निवडीवरून हिमाचलमध्ये घमासान

Patil_p

कोरोनाचा फटका विम्बल्डनलाही !

prashant_c