Tarun Bharat

शिवकालीन माहिती समजण्यासाठी ऐतिहासिक दिन महत्वपूर्ण ठरेल

Advertisements

वार्ताहर/ औंध

नवीन पिढीला स्वराज्याचे संस्थापक छ. शिवाजी महाराज यांचा इतिहास समजला पाहिजे. ऐतिहासिक वास्तू, घटना यांचे महत्त्व जाणून घेण्यासाठी ऐतिहासिक दिन महत्वपूर्ण ठरेल. पुस्तकातील ज्ञानाबरोबरच असे उपक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतील, असा विश्वास औंध शिक्षण मंडळाच्या चेअरमन गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी व्यक्त केला.

 येथील राजा भगवंतराव ज्युनिअर कॉलेजमध्ये स्व. श्रीमंत श्रीपतराव भगवंतराव पंतप्रतिनिधी यांच्या 25 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या ऐतिहासिक दिन आणि सायकल बँकेचे उद्घाटन या संयुक्त कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

 यावेळी व्हा. चेअरमन चारुशिलाराजे पंतप्रतिनिधी, राजकन्या हर्षिताराजे पंतप्रतिनिधी, विश्वस्त हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने, शंकरराव खैरमोडे, बापूसाहेब कुंभार, सचिव प्रदीप कणसे, सहसचिव शाकीर आत्तार, संजय निकम, सरपंच सोनाली मिठारी, प्राचार्य एस. बी. घार्गे, उपप्राचार्य प्रा. प्रदीप गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

  कै. श्रीपतराव पंतप्रतिनिधी महाराज यांच्या समाधीपासून ज्योत प्रजल्वित करून  औंध शिक्षण मंडळच्या प्रवेशद्वारापर्यंत आणण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्योतीचे स्वागत करण्यात आले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि शिवकालीन शस्त्र प्रदर्शन दालनाचे उद्घाटन श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिवकालीन शस्त्रांची माहिती व्हावी त्याचा आणखीन सखोल अभ्यास करता यावा यासाठी हे प्रदर्शन भरवल्याचे प्रा. नितीन भोसले यांनी सांगितले. बारावीच्या सीईटी परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवलेल्या विद्यार्थी, पालक यांचा सत्कार गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आला.

 उपप्राचार्य प्रा. प्रदीप गोडसे यांच्या संकल्पनेतून आणि गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी चेअरमन यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीपतराव पंतप्रतिनिधी राजेसाहेब सायकल बँकेचे उद्घाटन करण्यात आले. होतकरू, हुशार, गरजू अशा परगावहून शिक्षणासाठी  येणाऱया विद्यार्थी विद्यार्थिनींना एकूण 28 सायकलींचे वाटप करण्यात आले. शिवकालीन युद्धकलांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी औंध शिक्षण मंडळ औंधच्या सर्व विद्या शाखेमध्ये शिकणाऱया विद्यार्थ्यांना शिवकालीन युद्ध कलांमध्ये होणारे विविध साहसकला यांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. प्रा. प्रमोद राऊत यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, पालक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.   

सायकल बँकेसाठी माजी विद्यार्थ्यांची मदत

Related Stories

‘आरे’चा विरोध काही अंशी प्रायोजित : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Abhijeet Khandekar

कोयनेच्या पाणीसाठय़ाने अखेर पन्नाशी ओलांडली!

Patil_p

सातारचे नवे पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल

Archana Banage

आई अंबाबाईला मानाचा शालू अर्पण

Archana Banage

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांनी ओलांडला 19.50 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar

सातारा : जिल्ह्यात लसीकरणाचा विक्रम

datta jadhav
error: Content is protected !!