Tarun Bharat

शिवकुमारांविरोधातील प्राप्तिकरची याचिका फेटाळली

प्रतिनिधी / बेंगळूर

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना सोमवारी उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. करचुकवेगिरी प्रकरणातील पुरावे नष्ट केल्याचा आरोप त्यांच्यावर असून विशेष न्यायालयाने दिलेला आदेश उच्च न्यायालयाने उचलून धरला प्राप्तिकर विभागाने दाखल केलेली याचिका फेटाळली आहे.

माजी मंत्री डी. के. शिवकुमार यांच्याविरोधात करचुकवेगिरी प्रकरणाशी संबंधित तीन याचिका बेंगळूरमधील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने फेटाळून लावल्या होत्या. या आदेशाला आक्षेप घेत प्राप्तिकर विभागाने उच्च

न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जॉन मायकल कुन्हा यांच्या पीठाने सुनावणी करताना प्राप्तिकरने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. तसेच विशेष न्यायालयाने दिलेला आदेश योग्यच असल्याचे सांगितले आहे.

करचुकवेगिरी प्रकरणी प्राप्तिकर अधिकाऱयांनी रिसॉर्टवर छापा टाकल्यानंतर शिवकुमार यांनी महत्त्वाची कागदपत्रे फाडून नष्ट केली होती, असा आरोप होता. तसेच विशेष न्यायालयाने आपल्या कक्षेबाहेर जात आरोपीला निर्दोष घोषित केले आहे, आ आक्षेपही प्रप्तिकर विभागाने घेतला होता.

प्राप्तिकर अधिकाऱयांनी दाखल केलेल्या तक्रारीप्रमाणे 2015-16 या कालावधीत शिवकुमार यांनी 3.14 कोटी रु. कर चुकविला होता. 2016-17 या वर्षात अंदाजे 2.56 कोटी रु. आणि 2017-18 मध्ये अंदाजे 7.08 कोटी रु. कर चुकविल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

Related Stories

बेंगळूर: मादक पदार्थांची तस्करी करणारी टोळी गजाआड

Archana Banage

बसव कॉलनीत खुनामुळे खळबळ

Tousif Mujawar

कर्नाटक: सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या १० हजारावर

Archana Banage

गॅस टँकरची कारला धडक, ६ जखमी

Archana Banage

हासनजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच ठार

Amit Kulkarni

पूर, कोरोना आव्हानांना प्रथम प्राधान्य : मुख्यमंत्री बोम्माई

Archana Banage