Tarun Bharat

शिवजयंतीनिमित्त केरी ‘ओव्हर ऐज बॉईज’तर्फे साफसफाई

वार्ताहर /केरी

शिवजयंतीनिमित्त केरी सत्तरी येथील ‘ओव्हर ऐज बॉईज’ या गटातर्फे केरीतील श्री सातेरी केळबाय आजोबा देवस्थान परिसरात साफसफाई करण्याचा उपक्रम राबवला.

यावेळी या गटातील परेश गावस, विजय गावस, सतीश गावस, फटी गावस, सत्यवान परीट, नामदेव गावस,  रुपेश, वैभव गावस, संगीता गावस, रेश्मा  गावस, रेश्मा विठ्ठल गावस, सुप्रिया गावस, सुषमा शेटकर, सुमित्रा गावस व श्रेया गावस आदींनी या उपक्रमात सहभाग घेतला. या उपक्रमाद्वारे मंदिरात आणि मंदिर परिसराची साफसफाई आणि प्लास्टिक व अन्य कचरा गोळा करून ग्रामपंचायतीच्या कचरा व्यवस्थापन यंत्रणेकडे सुपूर्द केला. केरी, घोटली आणि परिसरात सामाजिक कार्यात आपले योगदान देणाऱया या गटातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. हल्लीच या गटाने घोटली 2 येथील दिव्यांग व्यक्तीला मानसिक, तांत्रिक आणि औषधोपचार पुरवण्याचे कार्य या गटातर्फे करण्यात आले होते. यावेळी या गटाने केरी मंदिर परिसराची साफसफाई केली. या उपक्रमाला देवस्थान समिती आणि नकुल नाईक यांनी सफाई साहित्य पुरवून सहकार्य केले.

Related Stories

उड्डाणपुलाच्या मागणीसाठी कामरखाजन येथे नागरिक उतरले रस्त्यावर

Patil_p

नेरूल वाटेश्वर मंदिरात ‘स्वयंभू शक्ती’तर्फे घुमट आरती वर्ग

Amit Kulkarni

पाण्यात अडकलेली वळवई-सुर्ला फेरीबोट पोचविली धक्यावर

Patil_p

कोविड हॉस्पिटलातून तिघांना डिस्चार्ज

tarunbharat

वाळपई भागातील नाल्यांची साफसफाई पूर्ण

Amit Kulkarni

साळ येथील महादेव, सिद्धेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवाला भाविकांची गर्दी

Amit Kulkarni