Tarun Bharat

शिवजयंतीसाठी ठाकरे सरकारकडून नियमावली जाहीर

ऑनलाईन टीम / मुंबई : 


दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते. दरवर्षी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध ठिकाणी बहुविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

पण, यंदा मात्र कोरोना विषाणूच्या ससंसर्गाचे सावट असल्याने शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन ठाकरे सरकारकडून करण्यात आले आहे. 

  • ठाकरे सरकारची नियमावली : 
  • गड – किल्ल्यांवर जाऊन जयंती साजरी न करता घरी बसूनच हा उत्सव साजरा करावा.
  • सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटकांचे सादरीकरण अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये.
  • प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुकांना बंदी; महारांच्या पुतळ्यास अथवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक असेल.
  • 10 व्यक्तींच्या उपस्थितीतच शिवजयंती साजरी करावी जयंती; आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यास मात्र परवानगी असेल. पण, तिथेही नियमांचे पालन बंधकारक असेल.
  • कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण, महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासनाने या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत नागरिकांनाही तसे आवाहन करावे. 

Related Stories

विहिरीत पाणी पिण्यासाठी गेलेल्या बालकाचा बुडुन मृत्यू

Archana Banage

केरळमध्ये भीषण विमान दुर्घटना, विमानाचे दोन तुकडे

Archana Banage

नाराज काँग्रेस नेत्यांचे सोनिया गांधींना पत्र? ; कोल्हापूरच्या ‘या’ आमदारांच्या सह्या

Archana Banage

विद्युत उच्चदाबामुळे करवीर तालुक्यात घरगुती विद्युत उपकरणांचे नुकसान

Archana Banage

नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी अशक्य

datta jadhav

धक्कादायक! भाजप नेत्याने कुटुंबासह केलं विष प्राशन; चौघांचा मृत्यू

datta jadhav