Tarun Bharat

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा अनोखा उपक्रम

Advertisements

शिवरायांना वंदन करून नववर्षाची सुरुवात

प्रतिनिधी / बेळगाव

शिवप्रतिष्ठानतर्फे मंगळवारी छत्रपती शिवाजी उद्यान येथे मोठय़ा उत्साहात गुढीपाडवा साजरा करण्यात आला. मराठी वर्षारंभ होत असल्याने सर्व शिवभक्तांना शिवप्रतिष्ठानतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. गुढी उभारून पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा करण्यात आला. जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.

यावेळी बोलताना किरण गावडे म्हणाले, एकाच मूर्तिकाराकडे बेळगाव व रायगड येथे बसविण्यात येणारी शिवमूर्ती तयार करण्यासाठी देण्यात आली होती. काही कारणाने रायगडावर बसविण्यात येणारी मूर्ती न बसविता त्या ठिकाणी बेळगावसाठी तयार केलेली मूर्ती बसविण्यात आली. रायगडसाठी तयार केलेली मूर्ती बेळगावमध्ये बसविण्यात आली आहे. त्यामुळे आपण शिवरायांच्या समोरच गुढी उभारून नव्या वर्षाची सुरुवात करत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

यावेळी शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख अजित जाधव, विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण, किरण बडवाण्णाचे, अंकुश केसरकर, विजय कुंटे, गिरीष कणेरी, आनंद कांबळे, ओंकार पुजारी, मारुती पाटील, प्रमोद कंग्राळकर, अजय सुगणे, रोहित मुळे, केतन नायकर, सोमेश बेनके, संदीप जाधव, सुशांत तरळे, गजानन निलजकर, अतुल केसरकर, मजुकर मामा यांच्यासह महिला व बालचमू उपस्थित होते.

Related Stories

पैशांची मागणी हे हताशपणाचे प्रदर्शन : ढवळीकर

Omkar B

डॉक्टर व नर्सेससाठी आत्ता पेड क्वारंटाईन सुविधा

Omkar B

पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांना मंञीपद देण्याची पेडणे भाजप कार्यकर्त्यांची मागणी

Amit Kulkarni

दुचाकी चोरी प्रकरणी दोघा संशयितांना अटक

Omkar B

राज्यात पेट्रोल रु.1.30 तर डिझेल 60 पैशांनी महागले

Amit Kulkarni

राजकारणाच्या डावात मायकल लोबो अखेर सफल

Amit Kulkarni
error: Content is protected !!