Tarun Bharat

शिवप्रति ष्ठानचे कार्यकर्ते सांगलीला रवाना

प्रतिनिधी/ बेळगाव

शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते शनिवारी सकाळी ‘धर्मवीर ज्वाला’ आणण्यासाठी सांगलीला रवाना झाले. सांगली जिल्हय़ातील वढू बुदुक येथून धर्मवीर ज्वाला सांगली शहरात आणण्यात आली आहे. तेथून ती ज्वाला बेळगावमध्ये आणण्यात येणार आहे. रविवारी सकाळी या ज्वालेचे शहरात आगमन होणार आहे. शिवप्रतिष्ठानचे 30 कार्यकर्ते ज्वाला आणण्यासाठी सांगलीला रवाना झाले.

प्रारंभी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाप्रमुख किरण गावडे यांच्या हस्ते वाहनाचे पूजन करण्यात आले. यावेळी किरण गावडे यांनी ‘धर्मवीर ज्वाले’चे महत्त्व उपस्थित कार्यकर्त्यांना पटवून दिले. तसेच संभाजी ज्वालेचे दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

यावेळी तालुका प्रमुख परशुराम कोकीतकर, शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण, अनंत चौगुले, किरण बडवाण्णाचे, प्रवीण मुरारी यासह शिवप्रति÷ानचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कल्लाप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे कार्यकर्ते सांगलीला रवाना झाले.

रविवारी सकाळी धर्मवीर ज्वाला बेळगावमध्ये

सांगली येथून शिवप्रति÷ानचे कार्यकर्ते धर्मवीर ज्वाला घेऊन रविवारी सकाळी बेळगावमध्ये दाखल होणार आहेत. सकाळी 7 वा. धर्मवीर संभाजी चौक येथे ही ज्वाला दाखल होणार आहे. ज्वाला पूजनानंतर ताशिलदार गल्ली येथील सोमनाथ मंदिर येथे दर्शनासाठी ठेवली जाणार आहे.

Related Stories

महामार्गात जमीन गेलेल्या शेतकऱयांना न्याय मिळवून देवू

Patil_p

अनगोळ येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Amit Kulkarni

लोककल्प फौंडेशनतर्फे पारवाड येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर

Amit Kulkarni

वडगाव ढोर गल्लीत श्री रामनवमी उत्साहात साजरी

Amit Kulkarni

कंझ्युमर फोरम बेळगावमध्येच ठेवा

Amit Kulkarni

नगरसेवक साळुंखे यांनी स्वखर्चाने केली पाण्याची सोय

Rohit Salunke