Tarun Bharat

शिवबसवनगर येथून इनोव्हाची चोरी

Advertisements

माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद

प्रतिनिधी/ बेळगाव

शिवबसवनगर येथे घरासमोर उभी करण्यात आलेल्या इनोव्हाची चोरी झाली आहे. शनिवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. माळमारुती पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

डॉ. मृत्यूंजय बेल्लद यांनी फिर्याद दिली आहे. केए 22 एमए 4761 क्रमांकाची इनोव्हा त्यांनी शुक्रवारी रात्री आपल्या घरासमोर उभी केली होती. शनिवारी सकाळी पाहिले असता कारची चोरी झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर माळमारुती पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

जिल्हय़ात 225 तर बेळगावात 42 दारू दुकाने उघडली

Patil_p

आतापर्यंत 40 हजार संशयितांची स्वॅब तपासणी

Tousif Mujawar

नूतन पोलीस आयुक्तांनी सुत्रे स्वीकारली

Patil_p

शुक्रवारी 114 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

Patil_p

खून महाराष्ट्रात अन् विल्हेवाट कर्नाटकात

Amit Kulkarni

सलग चौथ्या दिवशीही शास्त्रीनगर येथे शोधमोहीम

Patil_p
error: Content is protected !!