Tarun Bharat

शिवभोजनासाठी आधारकार्डची सक्ती नाही : छगन भुजबळ

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 

26 जानेवारी रोजी सुरु होणारे ‘शिवभोजन’ हे गरीब व गरजू व्यक्तीसाठी आहे. यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली नाही. दहा रुपयांच्या या थाळीसाठी फोटो व आधर कार्ड दाखवावे लागेल असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले. ती अफवा आहे.

भुजबळ म्हणाले, शिवथाळी योजनेचा फायदा गरीबांनाच मिळावा व या योजनेचा गैरफायदा कुणी घेऊ नये याची आम्ही काळजी घेणार आहोत. तसेच शिवभोजन केंद्रावर प्रथम येणाऱयास प्रथम प्राधन्य देऊन शिवभोजन योजनेचा लाभ देण्यात येईल, असंही छगन भुजबळ यांनी म्हटले.

या योजनेतर्गत सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राज्यात प्रत्येक जिह्याचे मुख्यालय व महानगरपालिका क्षेत्रात किमान एक भोजनालय सुरु करण्यात येणार आहे. हे भोजनालय वर्दळीच्या ठिकाणी असेल. ही भोजनालये दुपारी 12 ते 2 या कालावधीत कार्यरत राहतील. या भोजनालयात योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राखीव जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित भोजनालय चालकाची आहे.

 

 

Related Stories

पुतण्याने लस घेतल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Abhijeet Shinde

मराठा आरक्षण : घटनापीठाचा निर्णय लवकरच

Abhijeet Shinde

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प वन्यजीवांनी समृद्ध, ३०८ वन्यजीवांचा अधिवास

Rahul Gadkar

फडणवीसांचा मोठेपणा त्यांनी मला संधी दिली- एकनाथ शिंदे

Abhijeet Khandekar

स्थलांतरीत कामगारांची वैद्यकीय तपासणी मोफत करा

Abhijeet Shinde

”मी प्रबोधनकारही वाचलेत आणि यशवंतराव चव्हाणही”; शरद पवारांच्या वक्तव्यावर राज ठाकरेंच प्रत्युत्तर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!