Tarun Bharat

शिवराय आणि तानाजींची शौर्यगाथा अविस्मरणीय

निवृत्त ब्रिगेडिअर रणजित मिश्रा यांचे प्रतिपादन

बेळगाव/ प्रतिनिधी

मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान छत्रपती शिवरायांना आपला आदर्श मानून दरवेळी विजयी घोडदौड करतात तर स्वराज्यासाठी प्रसंगी प्राणाची आहुती दिलेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्याकडून स्वामिनि÷ा शिकता येते. शिवरायांनी गनिमीकावा या युद्धनीतीद्वारे अफाट अशा शत्रूवर विजय मिळविला. त्यामुळे शिवाजी महाराज व  तानाजी यांनी गाजविलेल्या शौर्याला आपण आजही स्मरत असल्याचे प्रतिपादन निवृत्त ब्रिगेडिअर रणजित मिश्रा यांनी केले.

लोकमान्य सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्राच्यावतीने सोमवारी धर्मवीर संभाजी उद्यान येथे मराठा शौर्यदिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. मराठय़ांची शौर्यगाथा, वीरनारींचा सत्कार व जाणता राजा नाटय़ाचा प्रयोग असा संयुक्त कार्यक्रम यावेळी पार पडला. लोकमान्य परिवारातर्फे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदान दिनाच्या पूर्वसंध्येला हा मराठा शौर्यदिन साजरा करण्यात आला. भव्यदिव्य अशा या शौर्यदिनाला मराठा लाईट इन्फंट्रीचे अधिकारी, जवान व नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

व्यासपीठावर लोकमान्य को-ऑप. सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. दामोदर वागळे, मराठा लाईट इन्फंट्रीचे डेप्युटी कमांडर कर्नल पी. एल. जयराम, जे. एल. विंगचे कमांडर स्वप्निल, लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब, अजित गरगट्टी, प्रभाकर पाटकर, गजानन धामणेकर, प्रा. अनिल चौधरी, सीईओ अभिजित दीक्षित तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ब्रिगेडिअर मिश्रा म्हणाले, शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात कान्होजी आंगे, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारखे एकाहून एक सरस असे मावळे होते. या मावळय़ांच्या जोरावर तानाजी मालुसरेंनी कोंढाण्यावर भगवा फडकवला. हाच भगवा घेऊन मराठा जवान शत्रूंवर तुटून पडतात. त्यामुळे आजही मराठा इन्फंट्री हा शौर्यदिन मोठय़ा उत्साहात साजरा करते, असे त्यांनी सांगितले.

सैन्यातील अधिकाऱयांचा गौरव

सध्या सैन्यात असलेले व निवृत्त झालेल्या अधिकाऱयांचा लोकमान्यतर्फे भव्य असा सत्कार करण्यात आला. कर्नल दिग्विजय जाधव, कर्नल ए. बी. जाधव, कर्नल मनोज शेट्टी, कर्नल महाजन, कर्नल अशोक, कर्नल जे. के. वेदांगन, कर्नल उल्हास बदोली, कर्नल दीपक गुरूंग या लष्करी अधिकाऱयांचा मान्यवरांच्या हस्ते शाल-श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

वीरपत्नी-मातांचा सन्मान

देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांच्या पत्नी, वीरनारी व पित्यांचा लोकमान्य परिवारातर्फे सन्मान करण्यात आला. मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान भरमा कृष्णा कुटाळे यांची पत्नी लक्ष्मी, कै. कल्लाप्पा तुकाराम खडेवाडकर यांच्या पत्नी रेखा, कै. विजयकुमार बाबुराव पाटील यांच्या पत्नी सुनिता, कै. जोतिबा गणपत चौगुले यांचे वडील गणपती चौगुले, कै. राहुल सुळगेकर यांचे वडील भैरू सुळगेकर यांचा निवृत्त ब्रिगेडिअर रणजित मिश्रा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाली. संचालक पंढरी परब यांनी उपस्थितांचे स्वागत करून लोकमान्य सोसायटीच्या प्रगतीचा आलेख सर्वांसमोर मांडला. संचालक प्रा. अनिल चौधरी यांनी प्रास्ताविक करून मराठी शौर्यदिन व नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाविषयीची माहिती दिली. कर्नल दीपक गुरूंग यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक विनायक जाधव यांनी केले.

जाणता राजातून शौर्याचे दर्शन

छत्रपती शिवाजी महाराजांचा भारून टाकणारा इतिहास ‘जाणता राजा’ या नाटय़ातून रंगमंचावर सादर करण्यात आला. बेळगावच्या 80 कलाकारांनी शिवरायांच्या जन्मापासून रायगडावर स्थापना करण्यात आलेल्या स्वराज्याच्या राज्याभिषेकापर्यंतचा इतिहास उभा केला. अंगावर रोमांच आणणारे प्रसंग आणि त्याला शिवप्रेमींनी घोषणांची दिलेली दाद यामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.

बेळगावच्याच तुळजा भवानी सांस्कृतिक प्रति÷ानने जाणता राजाचा 11 वा प्रयोग सोमवारी सादर केला. अफझलखानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटे छाटली, तानाजी मालुसरे यांचा पराक्रम असे एकाहून एक सरस असे प्रसंग सादर करण्यात आले.  अप्रतिम अशी बालशिवाजीची भूमिका करून अवधुत देसाई याने आपल्या व्यक्तीरेखेची छाप पाडली. शुभम होनगेकर याने तरुणपणातील शिवराज सर्वांसमोर उभे केले. गणेश उसुलकर यांनी सळसळता इतिहास सादर करून शिवशाही उभी केली. आरती कावळे हिने साकारलेली जिजामातेची भूमिका लक्षवेधी ठरली. तर शाहीराची भूमिका साकारलेल्या निशांत जाधव यांना पेक्षकांनी वेशेष दाद दिली.

Related Stories

बोगस रेशनकार्डधारकांना प्रशासनाचा दणका

tarunbharat

गोवावेस येथील वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त

Patil_p

भाग्यनगर येथे कचरा साचल्याने परिसरात दुर्गंधी

Amit Kulkarni

दुचाकी-कार अपघातात एक ठार, दोन गंभीर

Amit Kulkarni

… एका वृद्धेची सेंच्युरी अशीही !

Amit Kulkarni

पूर ओसरतोय, पण नागरिकांच्या वेदना कायम

Amit Kulkarni