Tarun Bharat

शिवशंभोचे दर्शन मंदिराबाहेरुनच…

यंदाही कोरोनाचे सावट श्रावणी सोमवारांवर कायम

प्रतिनिधी/ सातारा

 हिंदू पंचांगानुसार अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱया श्रावण मासाला सोमवार दि. 9 पासुन सुरूवात झाली. या महिन्यात विशेषतः शंभो महादेवाची आराधना केली जाते. पण मागील वर्षाप्रमाणे यंदाही या सणावर कोरोनाचे सावट अद्यापही कायम आहे. कारण सध्या बाजारपेठ जरी खुली असली तरी देवस्थाने मात्र बंद ठेवण्यात आली आहेत. मंदिरे जरी बंद असली तरी शहर परिसरातील मुख्य मंदिरांच्या बाहेरून भाविकांनी देवाचे दर्शन घेतले. त्यामुळे भाविकांमध्ये नाराजाचे वातावरण दिसत होते. 

यामुळे शहरातील काशी विश्वेश्वर मंदिर, मंगळवार पेठ, शिवपार्वती मंदिर शनिवार पेठ, राजेश्वर मंदिर कमान हौद, कृष्णेश्वर मंदिर चिमणपुरा, याचबरोबर शहराबहेरल पाटेश्वर, कुर्णेश्वर मंदिर, यवतेश्वर, कोटेश्वर, पेट, परळी महादेव मंदिर परिसरात भाविकांनी हजेरी लावली होती. कित्येकांनी तर अगदी पहाटे पाचच्या सुमारास जाऊन देवस्थानाच्या बाहेरून शिवशंकराचे दर्शन घेतले.

 यावर्षी श्रावण महिना 6 सप्टेंबरपर्यंत असून, यंदा पाच श्रावण सोमवार आले आहेत. या महिन्यात मांसाहार वर्ज्य केला जातो. तसेच कित्येक भाविकांकडून श्रावणी सोमवाराचे उपवास देखील पकडले जातात. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा आणि उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवमूठ वाहतात. मूठभर तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातूची शिवमूठ एकेक सोमवारी शिवाला वाहतात. तर नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी शिव मंगळागौरीची पूजा करतात. पहिली पाच वर्षे मंगळागौर केल्यानंतर, नंतरच्या एखाद्या वर्षी उद्यापन करतात. त्यावेळी आपल्या आईला वाण म्हणून सोन्याचा नाग देतात.

पांढऱया रंगांच्या फुलांना मागणी

यंदा मंदिरे जरी बंद असली तरी प्रत्येक देवस्थानाच्या पुजाऱयांतर्फे विधीवतपणे  अभिषेक, पूजा, मूर्तीला किंवा पिंडीला आकर्षक अशी आरास करण्यात आली होती. सदरची पूजा ही अगदी पहाटेच्या सुमारास करण्यात आली होती. सोमवारच्या दिवशी देवाला पांढऱया रंगाची फुले वाहिली जातात, त्यामुळे बाजारपेठेत पांढऱया रंगाच्या सर्वच फुलांना अधिक प्रमाणात मागणी होती. तसेच बहुसंख्य महिलावर्गांनी पांढऱया रंगाचा पोषाख ही परिधान केला होता.

Related Stories

मुरूडमध्ये कासवाच्या पिल्लांचे जलार्पण

Amit Kulkarni

खंबाटकी घाटात वेळेनजीक कारने घेतला पेट

Archana Banage

रस्त्यावरच्या भाजी मंडईवर पालिकेची कारवाई

Patil_p

जरंडेश्वर कारखान्यावर आयकरचा छापा

Amit Kulkarni

शहर अन् हद्दवाढीतील विकासकामांसाठी 1 कोटी

Patil_p

मान्सूनची दमदार एन्ट्री

Patil_p