Tarun Bharat

शिवशक्ती, मि.परमार, रॉयल स्ट्रायकर संघ विजयी

साईराज वॉर्डनिहाय क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक वॉर्डनिहाय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात सिद्धकला संघाने शिवाजी कॉलनी संघाचा 5 गडय़ांनी, शिवशक्ती संघाने भगवा रक्षक संघाचा 24 धावानी, मि. परमार संघाने मोरया संघाचा 19 धावांनी, रॉयल स्ट्रायकर संघाने मदर इंडिया संघाचा 22 धावांनी तर क्रिकेट लव्हर्स संघाने सिद्धकला संघाचा 8 गडय़ांनी पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. महेश आंबेवाडीकर, ईश्वर इटगी, प्रसाद, प्रवीण शेरी, विशाल गौरगोंडा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

व्हॅक्सिन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात शिवाजी कॉलनी संघाने 8 षटकात 6 बाद 65 धावा केल्या. स्वप्निल पाटीलने 23 धावा केल्या. सिद्धकलातर्फे महेशने 1 गडी बाद केला. त्याला उत्तर देताना सिद्धकला एसव्ही रोड संघाने 7 षटकात 5 बाद 66 धावा करून सामना 5 गडय़ानी जिंकला. महेशने 30 धावा केल्या. दुसऱया सामन्यात शिवशक्ती संघाने 8 षटकात 4 बाद 63 धावा केल्या. राजेश डी.ने 25 धावा केल्या. त्याला उत्तर देताना भगवा रक्षक संघाने 8 षटकात 8 बाद 39 धावाच केल्या. शिवशक्तीतर्फे ईश्वर इटगीने 3 गडी बाद केले.

तिसऱया सामन्या मि. परमार संघाने 8 षटकात 4 बाद 68 धावा केल्या. रवीने 16 धावा केल्या. त्यानंतर मोरया संघाचा धाव 7 षटकात 49 धावात आटोपला. मि. परमारतर्फे प्रसादने 5 गडी बाद केले.

चौथ्या सामन्यात रॉयल स्ट्रायकर संघाने  8 षटकात 6 बाद 76 धावा केल्या. प्रवीण शेरीने 44 धावा केल्या. त्यानंतर मदर इंडिया संघाने 8 षटकात 6 बाद 76 धावाच केल्या. रमेशने 37 धावा केल्या. रॉयलतर्फे प्रवीणने 2 गडी बाद केले.

पाचव्या सामन्यात सिद्धकलाने 8 षटकात 6 बाद 53 धावा केल्या. क्रिकेट लव्हर्सतर्फे विशाल गौरगोंडाने 1 गडी बाद केला. त्यानंतर क्रिकेट लव्हर्सने 5 षटकात 2 बाद 55 धावा करून सामना 8 गडय़ांनी जिंकला. विशाल गौरगोंडाने 21 धावा केल्या.

सामन्यानंतर प्रमुख पाहुणे अमर सरदेसाई, महेश फगरे यांच्या हस्ते विशाल गौरगोंडा तर दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे अनुप माळी, दौलत शिंदे, प्रवीण घाडी व संभाजी देसाई यांच्या हस्ते प्रवीण शेरी याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

Related Stories

एपीएमसीतील भाजीमार्केट पुन्हा गजबजले

Patil_p

तालुक्मयात अजूनही 17 कोटीची घर-पाणीपट्टी शिल्लक

Omkar B

कामगार किट ऐवजी त्याची रक्कम थेट बँकेत जमा करा

mithun mane

कन्नड विषयासंदर्भात संभ्रम

Amit Kulkarni

रामनगरनजीक दोन दुचाकी अपघातात तिघे गंभीर जखमी

Patil_p

विनामास्क नागरिक-वाहनधारक बिनधास्त

Patil_p
error: Content is protected !!