Tarun Bharat

शिवसेनाप्रमुख देशाचे मार्गदर्शक

Advertisements

शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याचे  शानदार अनावरण, बाळासाहेबांसाठी सर्वपक्षीय दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर

प्रतिनिधी / मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून त्यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे अनावरण  शनिवारी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले. या सोहळयासाठी राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होती.

बाळासाहेबांवरील प्रेमापोटी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,मनसे अध्यक्ष राज ठाकरे,विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,छगन भुजबळ,बाळासाहेब थोरात,जयंत पाटील आदी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. या निमित्ताने उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंना एकाच मंचावर बाजूबाजूला उपस्थित असताना पाहण्याचा दुर्मिळ योग यामुळे साधला गेला.सर्वपक्षीय नेते या निमित्ताने एकत्र आले.

मुंबई महापालिकेच्यावतीने कुलाबा येथील शामाप्रसाद मुखर्जी चौकात शिवसेनाप्रमुखांचा पुतळा उभारण्यात आला आहे. मूर्तिकार शशिकांत वळके यांनी हा पुतळा तयार केला आहे.

सभेला अभिवादन करतानाची मुद्रा

बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्कच्या मैदानावर त्यांचे दसरा मेळाव्यातील भाषण हा शिवसेनेच्या राजकीय वाटचालीतील ऐतिहासिक आणि महत्वाचा टप्पा आहे.  शिवसेनाप्रमुखांची अमोघ वाणी हेच त्यांचे ब्रम्हास्त्र होते. बाळासाहेब ज्या वेळेला सभेला संबोधित करायला सुरूवात करायचे, त्यावेळी त्यांची  जशी मुद्रा असायची तशीच मुद्रा या पुतळयाची आहे. दोन्ही हात उंचावून  जनतेला संबोधित करतानाच्या मुद्रेत  बाळासाहेबांचा पुतळा आहे.त्याखाली शिवसेनाप्रमुख ज्या वाक्यांनी सभेला सुरूवात करायचे ती `जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो,भगिनींनो आणि मातांनो’ ही वाक्येही कोरण्यात आली आहेत.

फडणवीस, दरेकर यांची उपस्थिती

महाविकास आघाडीमुळे सध्या शिवसेना आणि भाजपचे संबंध टोकाचे ताणले गेले आहेत. तरीही भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे दोघे यावेळी आवर्जुन उपस्थित होते.

अविस्मरणीय क्षण : उद्धव  ठाकरे

शिवसेनाप्रमुखांचे विचार हे नेहमीच मार्गदर्शक ठरलेले आहेत.ते यापुढेही मार्गदर्शक ठरणार आहेत.आजचा क्षण हा तमाम शिवसैनिक आणि माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे.शिवसेनाप्रमुखांचे सर्वपक्षीय नेत्यांशी जवळचे संबंध होते.आज सर्वपक्षीय नेते आपापल्या पक्षाचे उंबरठे ओलांडून या निमित्ताने एकत्र आले त्याबद्दल सर्वांना धन्यवाद,अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमानंतर दिली

या कार्यक्रमाला  रश्मी ठाकरे,आदित्य ठाकरे यांच्यासह अमित ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, महापौर किशोरी पेडणेकर तसेच शिवसेनेचे मंत्री उपस्थित होते.

Related Stories

कामगारांनी स्थलांतर करु नये, राज्य शासन कामगारांच्या पाठीशी आहे : हसन मुश्रीफ

Rohan_P

पृथ्वीवरील स्वर्ग अर्थात श्रीनगरमधील ट्युलिप गार्डन होणार पर्यटकांसाठी खुले

Sumit Tambekar

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये पाचपट वाढ

Abhijeet Shinde

महाराष्ट्र : कृषिमंत्री दादा भुसे यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

तुकाराम मुंढेंनी स्विकारला नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार

prashant_c

हे राज्य ठोकशाहीचे

Patil_p
error: Content is protected !!