Tarun Bharat

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळ्यात आरोग्याचा महायज्ञ

Advertisements

करमाळा प्रतिनिधी

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने करमाळा शहरात 6 मार्च व 7 मार्च रविवार सोमवारी आरोग्याचा महायज्ञ होणार असून यावेळी रुग्णांना मोफत चष्मे, मोफत औषधे, मोफत विविध आरोग्य तपासण्या केल्या जाणार आहेत. तरी या शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड, तालुका समन्वयक शंभूराजे फरतडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख मयुरी यादव, संजय भालेराव ,संतोष मोटे, मोहम्मद रफी कुरेशी, दीपक भोसले, नागेश चेंङगे, नीलेश चव्हाण, अण्णा यादव, दशरथ कांबळे, राजेंद्र घाडगे, राजेंद्र चव्हाण, संजय जगताप, मारुती भोसले, केशव साळुंखे, भक्ती गायकवाड, कोमल भिसे, आरती मासाळ, सुवर्णा सुरवसे, सविता सुरवसे आदी प्रयत्न करत आहे.

या शिबिरामध्ये किडनी विकार, मधुमेह, नाक, घसा, मुत्रविकार, हृदयरोग, कर्करोग अशा अनेक आजारांची तपासणी करून मोफत औषधे दिले जाणार आहे. एखाद्या रुग्णाला मोठी शस्त्रक्रिया करायची गरज भासली तर तर त्याची शासकीय योजनेतून व्यवस्था करण्यात येणार आहे. यावेळी 1000 चष्मे डोळे तपासून मोफत वाटप करण्यात येणार आहेत. एन्जोप्लास्टी, ऍन्जिओग्राफी, बायपास सर्जरी या महागड्या शस्त्रक्रिया सुद्धा मोफत करून देण्यासाठी रुग्णांची नोंदणी करून घेण्यात येणार आहेत. या तपासणीसाठी मुंबई येथील प्रसिद्ध ज्युपिटर हॉस्पिटल चे तज्ञ डॉक्टर येणार आहेत. रविवारी सकाळी दहा वाजता या शिबिराच्या सुरुवात होणार असून सोमवारी सकाळी दहा सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. करमाळा तालुक्यातील परिसरातील नजीकच्या गरजू रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

Related Stories

आफ्रिका-इंग्लंड मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

Abhijeet Shinde

गौरी लंकेश हत्या: सहा आरोपींची जामीन याचिका कोर्टाने फेटाळली

Abhijeet Shinde

मालदीव 15 जुलैपासून पर्यटकांसाठी खुले

datta jadhav

घाऊक महागाई दर 10.49 टक्क्यांवर

Patil_p

जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav

सरकार पाडण्यासाठी अनेकजण मनात गुढ्या उभारतायत, मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!