Tarun Bharat

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या लवकरच नियुक्त्या

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर : पदाधिकारी संपर्क अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी/कोल्हापूर

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणारी शिवसेना जिल्हापातळीवर बळकट करण्यासाठी शिवसेन पदाधिकाऱ्यांच्या लवकरच नव्याने नियुक्त्या करणार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

राजेश क्षीरसागर यांच्या शिवालय कार्यालयामध्ये शनिवारी शिवसेना पदाधिकारी संपर्क अभियान झाले. अभियानाला शिवसैनिकांचा उर्त्स्पूत प्रतिसाद मिळाला. अभियानाच्या प्रारंभी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना क्षीरसागर बोलत होते.

हे ही वाचा : मुलाखतींच्या भूलथापांना बळी पडू नका

क्षीरसागर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली कोल्हापुरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुढील काळात काम करणार आहे. यासाठी जिल्हापातळीवर शिवसेना अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, महिला आघाडी प्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहरप्रमुख, महिला आघाडी शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख अशा विविध पदांवर पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या करणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

यावेळी सुजित चव्हाण, जयवंत हारुगले, शिवाजीराव जाधव, ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर, मंगल साळोखे, पूजा भोर, पुजा कामते आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

पावसामुळे सांगली-कोल्हापूर राज्य महामार्गावर वाहतूक कोंडी

Archana Banage

पानसरे हत्या खटल्याची सुनावणी १४ ऑक्टोबरला

Archana Banage

पद्मजा पोळ हिच्या चित्रकृतीच्या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन

Archana Banage

राधानगरी धरण स्थळावर शाहू जयंती साजरी करणार्‍या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Archana Banage

Kolhapur : कोल्हापूर- रत्नागिरी महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

Abhijeet Khandekar

घरगुती वीज बिल माफीसाठी १० ऑगस्टला राज्यस्तरीय धरणे आंदोलन

Archana Banage
error: Content is protected !!