Tarun Bharat

शिवसेना प्रवत्तेपदी उदय सामंतांची निवड

प्रतिनिधी/ रत्नागिरी

शिवसेनेने रत्नागिरीला पुन्हा झुकते माप देताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांची पक्ष प्रवत्तेपदी निवड केली आहे. खासदार संजय राऊत यांची मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सामंत यांच्यासह 10 नव्या प्रवक्त्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. सामंत यांच्या निवडीमुळे कोकणातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने या निवडी करण्यात आल्या आहेत. खासदार अरविंद सावंत, खासदार धैर्यशील माने, खासदार प्रियांका चतुर्वेदी, आमदार डॉ. नीलम गोऱहे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, आमदार सुनील प्रभू, आमदार प्रताप सरनाईक, महापौर किशोरी पेडणेकर यांची शिवसेना पक्ष प्रवत्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

   राजकारणातील अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणून उदय सामंत यांच्याकडे पाहिले जाते.  शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकौशल्याने पक्षात चांगला ठसा उमटवला आहे. निवडणुकीच्या काळात पुण्याची जबाबदारी सामंत यांच्याकडे देण्यात आली होती. त्यानंतर शिवसेना उपनेते म्हणून पक्षाने त्यांना मान दिला. त्यानंतर राज्य मंत्रीमंडळात उच्च व तंत्रशिक्षण खात्याची पॅबिनेट पदाची देऊन कोकणाचा सन्मान केला. आता त्यांच्या खांद्यावर पक्षप्रवत्तेपदाची जबाबदारी दिली आहे.

Related Stories

“एमटीडीसी”च्या कामांची चौकशी करा- संजू परब यांची किरीट सोमय्यांकडे मागणी

Anuja Kudatarkar

अर्थव्यवस्थेची घडी बसविण्यासाठी रिफायनरी हवीच : प्रमोद जठार

Patil_p

मूर्तीची नको, भक्तीची उंची वाढवा!

NIKHIL_N

तिवरेतील उर्वरित घरांसाठी सात कोटींचा निधी देणार!

Patil_p

दापोलीत राष्ट्रवादीचे सभापती सेनेच्या वाटेवर

Archana Banage

रत्नागिरी ते गोवा समुद्रात तेल प्रदूषणाचा धोका नाही

Archana Banage