Tarun Bharat

शिवसेनेची भाजपच्या विरोधात पोवई नाक्यावर निदर्शने

प्रतिनिधी/ सातारा

पोवई नाका येथे केंद्र सरकारच्या सततच्या पेट्रोल,डिझेल,गॅस भाववाढी विरोधात आणि तातडीने भाव वाढ कमी करून जनतेला नागरिकांना दिलासा द्यावा याकरिता सातारा शहर शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.यामध्ये सातारा शहर प्रमुख निमिष शहा यांनी सायकल चालवली व सायकलवरून निदर्शने केली.

        या निदर्शनांमध्ये शहर प्रमुख निमिष शहा,  बाळासाहेब शिंदे, तालुकाप्रमुख अतिश ननावरे, ऍड शिरीषकुमार दिवाकर, मारुती वाघमारे, सयाजी शिंदे, जितेंद्र वाघंबरे, सुनील भोसले, नंदू केसरकर, महिला संघटिका सौ. मीनल शहा, भगवानराव शेवडे, सुनील भालेराव, राजेंद्र नाईक, विशाल साळुंखे, अमित देशपांडे, प्रदीप दप्तरदार, सुभाष पवार, मोहित शहा, कांचन डांगरे, जितेंद्र महाडिक, सचिन शिंदे, योगेश शेलार, सुमित नाईक इत्यादी शिवसैनिक पदाधिकारी सहभागी झाले होते.यावेळी बोलताना निमिष शहा म्हणाले, गेल्या एक महिन्यापासून केंद्र सरकार छुप्या पद्धतीने रोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये 15 पैसे ,20 पैसे अशी वाढ करून लोकांच्या नजरेमध्ये धूळ फेकून सतत दरवाढ करत आहे गेले एक महिन्याभरात जवळजवळ पाच ते सहा रुपये दरवाढ झालेली आहे ही बाब जनतेच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने भाववाढ केंद्र सरकार करत आहे. म्दन्ग्d-19 च्या काळामध्ये नागरिक आर्थिक दृष्टय़ा डबघाईला आलेले आहेत ग्रामीण भागामध्ये वडाप वाहतूक शेतीसाठी लागणारे डिझेल तसेच भाजीपाला इतर ट्रान्सपोर्ट वाहतूक या दरांमध्ये सुद्धा यामुळे वाढ झालेली आहे परंतु रिक्षा, टॅक्सी, टेम्पो वाहतूकदार यांना भाडेवाढ शासनाकडून करून मिळत नाही एस टी महामंडळ सुद्धा डबघाईला आलेले आहे त्यांना पण डिझेल दरवाढीचा फटका बसलेला आहे.या सर्व नागरिकांच्या अडचणी बघितल्यास केंद्र व मोदी सरकारचा सातारा शहर शिवसेनेच्या वतीने केंद्र व मोदी सरकारचा जाहीर निषेध करून पोवई नाक्यावर निदर्शने करण्यात आली.

Related Stories

देशी रिव्हॉल्वर बाळगणारा गुन्हेगार जेरबंद

Omkar B

बारामतीच्या घनश्याम केळकरांचे चार हजार किलोमीटरचे पायी भ्रमण

Patil_p

बडय़ा धेंडाची वसूली होणार सक्तीने

Patil_p

नवं सरकार स्थापनेनंतर मुलाखतीत काय म्हणाले बच्चू कडू; जाणून घ्या सविस्तर

Abhijeet Khandekar

जनावरांच्या लसीकरणाची मोहीम अंतिम टप्प्यात

datta jadhav

करंजे एमआयडीसी प्रकरणी नुसताच वर्षभर खेळ

Archana Banage